अभियानाच्या माध्यमातून सूचना

अभियानाच्या माध्यमातून सूचना
Published on
फोटो : H22389 -- सक्षमीकरणासाठी आत्मनिर्भर होण्याची गरज राजू शिरसाट : विधवा दिनानिमित्त मेळावा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : विधवा तथा एकल परितक्त्या महिलांना सक्षम व्हायचे असेल तर त्यांनी विविध उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार उभारणी करून आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विधवा महिला सन्मान व संरक्षण अभियानाचे राज्य समन्वयक राजू शिरसाट यांनी केले. प्रेम फाउंडेशन व विधवा महिला सन्मान व संरक्षण अभियान आयोजित विधवा दिनानिमित्त आयोजित विधवा मेळाव्यात ते बोलत होते. इगतपुरी तालुक्यातील वासाळी गावात मंगळवारी (ता. २३) कार्यक्रम झाला. या वेळी सरपंच सुनीता कोरडे, काशिनाथ कोरडे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, शोभा काळे, सावता दुधाळ उपस्थित होते. प्रसंगी संस्थेच्या प्रकल्प क्षेत्रात विविध उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आत्मनिर्भर झालेल्या विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला. सोबतच सेंद्रिय शेती करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना ताग बियाण्याचे वाटप करण्यात आले. माणुसकी बेघर निवारा केंद्राच्या वतीने विधवा महिलांना साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले. ---चौकट मांडलेल्या सूचना विधवा महिला एकल असू शकते मात्र, एकल आणि परितक्त्या महिला विधवा नसते. विधवा एकल व परित्यक्ता महिलांची स्वतंत्र वर्गवारी तर, विधवांना विशिष्ट दर्जा देण्यात यावा. विधवा महिलांसाठी पारंपरिक रूढी प्रथा व परंपरा यांना पायबंद घालण्यासाठी विशिष्ट कायद्याची तरतूद असावी. महिलांना विनामूल्य कायदेशीर सल्ला व समुपदेशन उपलब्ध करून द्यावे. खाजगी तथा शासकीय नोकऱ्यांमध्ये विधवा महिलांसाठी किमान पाच टक्के जागा राखीव असाव्यात. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com