जुन्या भांडणातून दोन कुटूंबीय भिडले

जुन्या भांडणातून दोन कुटूंबीय भिडले
Published on
जुन्या भांडणातून दोन कुटुंबांत मारहाण ---- शनिपेठ पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : शहरातील शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडारवाडा येथे जुन्या वादातून विळ्याने वार करून बोट कापल्याची घटना मंगळवारी (ता.२३) दुपारी १२ला घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात परस्परविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चौगुले प्लॉटच्या ओकनगरात दुर्गेश चंद्रकांत सपकाळे (वय २२) कुटुंबीयासह वास्तव्यास आहे. मंगळवारी परिसरातील चेतन सोनार व त्याच्या वडिलांनी जुन्या भांडणाचा वाद उकरून काढला. त्यात दोघांनी दुर्गेशवर विळ्याने वार करुन त्याचे बोट कापले, त्यानंतर त्याची आई व चुलत भावावरही विळ्याने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी जखमींच्या तक्रारीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक अमीत तडवी करीत आहेत. दगडाने हल्ला दरम्यान, दुसऱ्या गटाकडून स्वयंपाकी पितांबर तुकाराम सोनार (वय ५२, रा.चौगुले प्लाट, जळगाव) यांनी तक्रार दिली आहे. त्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे मंगळवारी (ता.२३) दुपारी जुन्या भांडणाच्या रागातून शैलेंद्र काशिनाथ सपकाळे याने पिंतांबर सोनार याच्या डोक्यात विळ्याने वार केला. तर, संशयित दुर्गेश सपकाळे याने दगडाने हल्ला करून जखमी केले. त्यानंतर मयूर दीपक सपकाळे याने चापटाबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी जखमीने तिघांविरुद्ध तक्रार दिल्याने शनिपेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक शशिकांत पाटील करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com