समुपदेशन पद्धतीने २५ परिचरांना आरोग्य सेवकपदी पदोन्नती

समुपदेशन पद्धतीने २५ परिचरांना आरोग्य सेवकपदी पदोन्नती
Published on
आरोग्य सेवकपदी परिचरांना पदोन्नती जळगाव, ता. २४ : जिल्हा परिषदेअंतर्गत परिचर वर्ग ४ या पदावर कार्यरत २५ कर्मचाऱ्यांना समुपदेशन पद्धतीने आरोग्यसेवक या वर्ग ३ पदावर पदोन्नती देण्यात आली. ही प्रक्रिया बुधवारी(ता.२४) छत्रपती शाहू महाराज सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश धापते, प्रशासन अधिकारी डॉ. राजेश जैन, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पात्र ठरलेल्या २५ कर्मचाऱ्यांना वर्ग ४ मधून वर्ग ३ मधील आरोग्य सेवक पदावर पदोन्नती देण्यासाठी ही समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली. एकाच वेळी २५ कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवक पदावर पदोन्नती मिळाल्याने कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवक म्हणून अधिक जबाबदारीने व गुणवत्तापूर्ण सेवा देऊन ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सीईओ करिश्मा नायर यांनी केले.
Marathi News Esakal
www.esakal.com