(टुडे पान एक अँकर)
---
NSK26H22420
नंदुरबार : केंद्रप्रमुखांच्या नियुक्तीप्रसंगी उपस्थित कर्मचारी.
---
जिल्हा परिषदेत ४४ केंद्रप्रमुखांची नियुक्ती
दहा शिक्षकांना शिक्षण विस्ताराधिकारीपदी पदोन्नती
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २४ : जिल्हा परिषदेच्या ४४ केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली असून, दहा शिक्षकांना शिक्षण विस्ताराधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा अंतर्गत उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना समुपदेशनाद्वारे गुणानुक्रमे ही पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नयन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविण्यात आली.
जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांच्या एकूण ४५ रिक्त पदांपैकी ४४ शिक्षकांना गुणानुक्रमानुसार समुपदेशनाद्वारे सरळसेवेने केंद्रप्रमुख पदावर पदस्थापना देण्यात आली आहे. यात दोन दिव्यांग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच दहा शिक्षकांना पदोन्नतीने शिक्षण विस्ताराधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. सहा शिक्षकांना पदोन्नतीने केंद्रप्रमुखपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही संपूर्ण पदोन्नती आणि समुपदेशन प्रक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रक्रिया पार पाडण्यासाठी योजना उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, सहायक प्रशासन अधिकारी एस. पी. जाधव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी एस. बी. कंखर, विजय राजपूत, विस्ताराधिकारी रमेश गिरी, संकलन सहायक स्वप्नील गावित, परेश वळवी, स्वप्नील पाटील आणि प्रवीण पवार यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता पाळण्यात आल्याने गुणानुक्रमे पदस्थापना मिळालेल्या सर्व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
सरळसेवेने नियुक्ती
केंद्रपमुख म्हणून नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रवीण पगारे, चेतन निकुंभ, विजय न्याहळदे, प्रशांत बागूल, भूपेश काटे, विनोद बडगुजर, माणिक चाटे, मनोज पिंजारी, राकेश अहिरे, अनिल पाटील, राकेश चौधरी, नंदकिशोर पाटील, अशोक बागले, मनीषा हुरेज, बाळकिशन ठोबरे, पल्लवी पाटील, अनिल सोनवणे, धीरज खैरनार, सूरज माने, रूपेश मोरे, तुषार नांद्रे, जितेंद्र निकुंभ, विजयसिंग पराडके, उमेश विसपुते, निर्मलकुमार पाटील, संदीप पाटील, भारती कुंवर, नितीन पिंपळे, नकुशा माने, जगन्नाथ बागूल, संदीप मगरे, वंदना पाटील, बाजीराव शिंदे, प्रशांत खैरनार, शिवदास सोलंकी, धर्मदास पाटील, अनंतकुमार बोरसे, कैलास वाघ, राहुल राजपूत, प्रशांत गुरव, निकिता जाधव, नितीन महाजन, प्रवीण पवार, अरुण पाटील आदींचा समावेश आहे.
केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती
संतोष तावडे, नितीन शिनकर, राहुल साळुंखे, अनंतकुमार सूर्यवंशी, सुनील चव्हाण, गोविंद वाडिले यांना केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
विस्तार अधिकारीपदी नियुक्ती
ललित बोरसे, रवींद्र माळी, सुनीता पावरा, सचिन पाटील यांना विस्ताराधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.