धावत्या ट्रॅक्टरवरुन पडून तरुणाचा मृत्यु

धावत्या ट्रॅक्टरवरुन पडून तरुणाचा मृत्यु
Published on
धावत्या ट्रॅक्टरवरून पडून तरुण मजूर जागीच ठार - आव्हाणे येथील घटना; मृत गुजरातचा रहिवासी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : दाहोद (गुजरात) येथील मूळ रहिवासी मजूर जळगाव शहरालगत अव्हाणे शिवारात वीट्टभट्टीवर कामासाठी आले होते. वीटभट्टीला लागणारी माती घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरच्या धूळवर बसले असताना खाली पडून चाकाखाली आल्याने विक्रम भाई रमनभाई खरडीया (वय २१) या मजूर तरुणाचा मृत्यू झाला. अव्हाणे (ता.जळगाव) येथील पद्माकर धनलाल शिरसाठ (वय ४८) यांचा शेती व्यवसाय व वीट्टभट्टीचे काम आहे. त्यांच्या वीटभट्टीवर अनेक परप्रांतीय मजूरांसह विक्रम भाई खरडीया (वय २१) व त्याचा भाऊ रुकेश कालू खरडीया असे दोघेही कामाला आहेत. मंगळवारी (ता.२३) संदिप सुरेश ढोले (रा.अव्हाणे) हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्रमांक एमएच २० एपी २७५१) आव्हाणे फाट्याजवळून वीटभट्टीवर आणीत होते. त्याचवेळी ट्रॅक्टरच्या धुळवर बसेलेला विक्रमभाई खरडीया हा खाली फेकला जावून ट्रॉलीच्या चाकात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला व त्याचा भाऊ जखमी झाला. दोघांना तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने जळगावच्या जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीअंती विक्रम यास मृत घोषित केले. याप्रकरणी पद्माकर शिरसाठ यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टरचालक संदिप ढोलेविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्‍याम कुमार मोरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com