विद्यार्थ्यांचे स्वागत

विद्यार्थ्यांचे स्वागत
Published on
धुळे : टुडे पान ३ साठी.. -- फोटो क्रमांक : 22424 मोराणे (ता. धुळे) : नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे शाळेत गुलाबपुष्प देत स्वागत करताना शालिनी भदाणे. -- सैनिकी विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत -- शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २४ : शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अत्यंत आनंददायी आणि संस्मरणीय असतो. हाच आनंद द्विगुणीत करत मोराणे (ता. धुळे) येथील श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत जल्लोषात स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रम विद्यालयाच्या सचिव तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शालिनी भदाणे यांच्या मार्गदर्शनात झाला. या वेळी विद्यालयात सर्वप्रथम रिपोर्ट झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सचिव भदाणे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित नवीन विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे मोफत शैक्षणिक साहित्य आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले. सचिव भदाणे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करत मार्गदर्शन केले. उपस्थित पालकांनीही विद्यालयाच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्राचार्य एस. बी. गरुड, उपप्राचार्य एन. जे. देवरे, पर्यवेक्षक बी. एच. मगर यांनी संयोजन केले. एच. जी. सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com