विद्यार्थ्यांचे आरोग्य होणार अधिक सुदृढ

विद्यार्थ्यांचे आरोग्य होणार अधिक सुदृढ
Published on
फोटो : 22436 नाशिक : ‘सीएसीआर’सोबत करार करताना आदिवासी आयुक्त लीना बनसोड, नितीन वाधवानी. ... विद्यार्थ्यांचे आरोग्य होणार अधिक सुदृढ ॲनिमियामुक्तीसाठी ‘आदिवासी विकास’चा पुढाकार; ‘सीएसीआर’सोबत सामंजस्य करार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये आढळणारी ॲनिमियाची (रक्तक्षय) समस्या दूर करण्यासाठी विभागाने ‘सिटिझन्स असोसिएशन फॉर चाइल्ड राइट्स’ (सीएसीआर) या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये ॲनिमिया हा एक मोठा अडथळा ठरत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची आरोग्य स्थिती, पोषण, शालेय उपस्थिती आणि बौद्धिक विकासावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ॲनिमिया निवारण कार्यक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण उपक्रमाचा खर्च सीएसीआर संस्था करणार असल्याने शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. ॲनिमिया निवारण कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक, निवासी परिचारिका, अधीक्षक आणि संगणक शिक्षक यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. यात विद्यार्थ्यांचे समुपदेशन, आरोग्य शिबिरांचे आयोजन, नियमित आरोग्य तपासणी आणि डिजिटल हेल्थ कार्ड पोर्टलवर माहितीची अचूक नोंद करणे अशा कामांचा समावेश आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या निधीतून गंभीर श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी पूरक आहाराची सोय करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सीएसीआर संस्थेच्या मदतीने ऑगस्ट २०२६ अखेर पहिली तपासणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानंतर दर तीन महिन्यांनी नियमित फॉलोअप तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, सामंजस्य करारप्रसंगी आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, अपर आयुक्त (मुख्यालय) डिगंबर चव्हाण, दिनकर पावरा, उपायुक्त संतोष ठुबे, शशिकला अहिरराव, ‘सीएसीआर’चे सीईओ नितीन वाधवानी उपस्थित होते. कोट आदिवासी विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्य आणि दर्जेदार शिक्षणाला नेहमीच प्राधान्य राहिले आहे. ॲनिमियामुक्तीसाठी ‘सीएसीआर’ संस्थेसोबत एक महत्त्वाकांक्षी सामंजस्य करार केला आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी एक भक्कम कवच निर्माण करत आहोत. -लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com