फोटो - NSK26H22443
NSK26H22444
ओझोनथेरपीद्वारे कंबरदुखीवर मात शक्य
आधुनिक जीवनशैली मानवी शरीरामध्ये अनेक आजारांना निमंत्रण देते. बैठे काम, व्यायामाचा अभाव, निकृष्ट आहार या बाबींमुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. कंबरदुखी हा त्यातल्या त्यात सर्वाधिक आढळणारा आजार. स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते.
- डॉ. नीलेश लोढा, पेन फिजिशियन
कंबरदुखीचे अनेक कारणे असू शकतात. त्यातील स्लिप डिस्क म्हणजे दोन मणक्यांमधील चकती बाहेर येणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. ही चकती मज्जारज्जूच्या नसांवर दबाव टाकते व नसेच्या आजूबाजूस सूज येते. अशावेळी कंबरदुखीच्या असह्य वेदना होतात. बऱ्याचदा हे दुखणे पायापर्यंत जाते. मुंग्या येणे, बधिरपणा वाटणे, जळजळ होणे अशी लक्षणे त्या भागात दिसू लागतात. तरुणांपासून वयोवृद्धापर्यंत कुणालाही हा आजार होऊ शकतो. गोळ्या औषधे घेऊन वेदना कमी होतात. परंतु नसेवरील दबाव कमी होत नाही व रुग्णास वारंवार वेदना होतात. अशा परिस्थितीत ओझोन थेरपी लाभदायक ठरू शकते.
ओझोन म्हणजे काय?
वातावरणातील ओझोन वायू आपणास सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवतो. एका विशिष्ट मशिनद्वारे ऑक्सिजनचे रुपांतर मेडिकल ओझोनमध्ये केले जाते. विविध आजारांवर विविध पद्धतीने ओझोनचा वापर केला जातो. ओझोन वायू दोन मणक्यांमधील चकतीमध्ये इंजेक्शनद्वारे सोडला जातो. हा वायू डिस्कमधील टॉक्सिन्स निकामी करतो तसेच ओझोन डिस्कमधील द्रवरूप पाण्यात विरघळतो. त्यामुळे डिस्क आकुंचन पावते व नसेवरील दबाव कमी होतो. ओझोन थेरपी ही शस्त्रक्रिया नाही. त्यामुळे या थेरपीचे काहीही दुष्परिणाम नाहीत. पाश्चात्त्य देशांमध्ये स्लिप डिस्कच्या उपचारासाठी पहिली निवड ओझोन थेरपीचीच केली जाते.
ओझोन थेरपीचे फायदे :
यामध्ये चिरा द्याव्या लागत नाही, जखम होत नाही, पूर्ण भूल देण्याची गरज नाही. जागेवरची भूल पुरेशी असते. हॉस्पिटलमध्ये अधिक वेळ राहण्याची गरज नाही. या थेरपीनंतर रुग्णाने ४८ तासांसाठी संपूर्ण आराम करावा. एक महिन्यापर्यंत जड वस्तू उचलू नये. वाकून काम करू नये. मणक्याचे व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच सुरू करावेत.