रिक्त पदे समावेशन ठराव

रिक्त पदे समावेशन ठराव
Published on
धुळे टुडे २ साठी ॲंकर... --- मानधनवरील कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांवर समावेशन --- शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यास महासभेची मंजुरी; खासगी ट्रॅव्हल्सला शुल्क आकारणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २४ : महापालिकेतील मानधनावरील लिपिक/टंकलेखक (कॉम्प्युटर ऑपरेटर), विद्युत विभागातील मानधनावरील विजतंत्री, एक सुपर फिल्ड वर्कर यांना महापालिकेच्या रिक्त पदांवर समावेशन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेने मंजूरी दिली. तर शहरातील खासगी ट्रॅव्हल्स यांच्याकडून स्वच्छता व वाणिज्य वापराबाबत शुल्क आकारण्याचा विषयही मंजूर करण्यात आला. --- धुळे महापालिकेची महासभा सकाळी अकराला महापालिकेत झाली. महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. महापालिकेतील मानधन तत्वावरील २३ लिपिक/टंकलेखक तसेच वीजतंत्री व एक सुपर फिल्ड वर्कर यांचे महापालिकेच्या रिक्त पदांवर समावेशनाचा विषय सभेपुढे होता. २०१६, २०१८, २०१९, २०२०, २०२१ अशा विविध कालावधीपासून हे कर्मचारी महापालिकेत आहेत. त्यामुळे त्यांच्या वयाचा विचार करुन वयात शिथिलता देण्यासह समावेशनाचा विषय शासनाकडे सादर करण्यास महासभेने मंजुरी दिली. ट्रॅव्हल्सला शुल्क शहरातील व शहरात प्रवेश करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स यांच्याकडून स्वच्छता व वाणिज्य वापराबाबत शुल्क आकारण्यासह मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने सदस्यांच्या सूचनेवरुन हा विषय मांडण्यात आला होता. दर सुधार समितीने मंजूरी दिल्यानुसार प्रतिवाहन/प्रतिदिवस २०० रुपये किंवा प्रतिवाहन/ प्रतिमहिना पाच हजार रुपये याप्रमाणे हे शुल्क असेल. नगरसेवक अमोल मासुळे यांनी विषयाला पाठिंब्याबद्दल प्रशासनासह सदस्यांचे आभार व्यक्त केले. फागणेला पाणी मौजे फागणे (ता. धुळे) गावाला मनपाच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याची जोडणी करण्यासह मान्यता देण्यात आली. धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या सूचनेवरुन हा विषय घेण्यात आला. मानवतेच्यादृष्टीने फागणे गावाला पाणी द्यावे. मात्र, धुळे शहराला पाण्याची टंचाई भासल्यास फागणेचे पाणी बंद करावे. तसेच, जलवाहिनीचा खर्च, वॉटरमीटर लावून पाणीपट्टी वसुल करावी, असेही ठरावात नमूद करण्यात आले. हे विषयही मंजूर मनपा शाळा-२८ समोरील मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारणे, वीरशैव लिंगायत गवळी समाज, वीरशैव लिंगायत पंचम समाज व दशनाम गोसावी समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करणे, मनपा मालकीच्या स्थावर मालमत्तांचे भाडेपट्टा निश्चित करणे, नूतनीकरण करणे, हस्तांतरण तसेच भाडे आकारणी करणे, मनपा संचलित स्व. विमलादेवी ओमप्रकाश अग्रवाल रुग्णालय कार्यान्वित करणे आदी विषयही मंजूर करण्यात आले. --- ...चौकट... वाघ यांना सुधारित वेतनश्रेणी नगरसचिव मनोज वाघ यांना सुधारित वेतनश्रेणी (एस-२०) लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासही महासभेने मंजुरी दिली. दरम्यान, श्री. वाघ सप्टेंबर- २०२६ अखेर निवृत्त होणार आहेत. मात्र, महापालिकेतील त्यांची गरज लक्षात घेता त्यांचा सेवाकाळ वाढविण्यात यावा व तसा प्रस्तावही शासनाकडे पाठवावा, अशी मागणी सत्ताधारी- विरोधी सदस्यांकडून करण्यात आली. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com