भाजपकडून झाडाझडती

भाजपकडून झाडाझडती
Published on
टूडे मेन कॉमन ----------- भाजपकडून पराभवाची झाडाझडती शहरासह ग्रामीण चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ असतानाही शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाल्याच्या धक्कादायक निकालानंतर भाजपने बंडखोरीची चौकशी सुरू केली आहे. महायुतीच्या ४६६ मतांपैकी २१८ मते फुटल्याने हा पराभव झाला असून, याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईचे संकेत भाजपने दिले आहेत. भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांनी बुधवारी नाशिकमध्ये येऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बंद दाराआड चर्चा केली. शहराध्यक्ष सुनिल केदार आणि गटनेते ॲड. शाम बडोदे यांना शहरातील मतफुटीचा अहवाल, तर जिल्हाध्यक्षांना ग्रामीण भागाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. नगरसेवकांशी चर्चा करून तयार झालेला हा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला जाणार आहे. निवडणुकीत महायुतीकडे एकूण ६१९ मतांपैकी ४६६ मते होती. त्यात भाजपचे १८८, शिवसेनेचे १७१ आणि राष्ट्रवादीचे १०७ मतदार होते. विजयासाठी ३०३ मतांचा कोटा निश्‍चित करण्यात आला. मतमोजणीत महायुतीचे दराडे यांना केवळ २४८ मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे गोकुळ गिते ३५७ मतांनी विजयी झाले. तब्बल १०९ मतांच्या फरकाने झालेल्या या पराभवाने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. गितेंच्या विजयात भाजपचा अंतर्गत पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गिते यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले असले तरी, भाजपने या मतफुटीला हलक्यात घेतले नाही. महाजन यांच्या सूचनेनंतरच चौकशीला गती मिळाल्याची चर्चा आहे. ---------------चौकट फुटीरांना दूर ठेवण्याचा इशारा चौकशीत व्हिप न पाळणाऱ्या नगरसेवकांची नावे समोर आल्यास त्यांच्यावर संघटनात्मक आणि पालिकेतील पदांवरून कारवाई होणार आहे. स्थायी समिती सभापती, सभागृहनेते, स्थायी समिती सदस्य अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या नगरसेवकांना मिळणार नसल्याचे पक्षांतर्गत सूत्रांनी सांगितले. पक्षशिस्त मोडणाऱ्यांना भविष्यातही संधी न देण्याची भूमिका भाजपने घेतल्याने शहर आणि जिल्हा पातळीवरील अनेक पदाधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. ---------कोट--------- विधान परिषदेच्या मतफुटीचा चौकशी अहवाल जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, गटनेत्यांकडून मागविला आहे. सदर अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला जाईल. - विजय चौधरी, संयोजक, भाजप. --------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com