सीए इंटरमिडीएटमध्ये हस्ती अव्वल

सीए इंटरमिडीएटमध्ये हस्ती अव्वल
Published on
H22455 सीए इंटरमिजिएट परीक्षेत हस्ती शाह देशात १७ वी नाशिकमध्ये प्रथम; श्रुती खालसे द्वितीय सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)तर्फे मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून नाशिकच्या हस्ती शाह हिने ४७२ गुण मिळवत शहरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच तिने देशपातळीवर १७ वा क्रमांक मिळवून नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या परीक्षेत श्रुती खालसे हिने ४४५ गुणांसह नाशिकमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. सृष्टी चिंचोळे (४३९ गुण) तृतीय, काव्य पाटील (४३२ गुण) चतुर्थ, तर शौर्य भुताडा (४३१ गुण) पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. नाशिक केंद्रातून दोन्ही गटांच्या परीक्षेसाठी ३४० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण २१.४७ टक्के आहे. केवळ गट-१ साठी ४१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९.५५ टक्के आहे. गट-२ साठी परीक्षा दिलेल्या २६६ विद्यार्थ्यांपैकी ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या गटाचा निकाल १७.२९ टक्के लागला. सीए इंटरमिजिएट ही चार्टर्ड अकाउंटन्सी अभ्यासक्रमातील महत्त्वाची पायरी असल्याने विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनत कायम ठेवणे आवश्यक असल्याचे मत आयसीएआय नाशिक शाखेचे अध्यक्ष सीए अभिजित मोदी यांनी व्यक्त केले. नियमित अभ्यास आणि चिकाटीच्या बळावर यश निश्चित मिळते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आयसीएआय नाशिक शाखेचे उपाध्यक्ष सीए मनोज तांबे, सचिव विशाल वाणी, कोषाध्यक्ष दिलीप बोरसे तसेच वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट स्टुडंट्स असोसिएशन (विकासा)चे अध्यक्ष रोहन कुलकर्णी, सहसदस्य शुभम मुंदडा, पियुष चांडक आदींनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com