धुळे ः टुडे १ साठी, फ्लायर मेन (शेजारील जाहिरातीच्या आकारात)
--
लोगो छायाचित्र सोयाबीन ः 22458
--
दीड हजार शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाणे
-
खाद्यतेल अभियान : साक्रीला ९७५ क्विंटलचा लक्षांक; माती परीक्षणाचे बंधन
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २४ : राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत जिल्ह्यातील एक हजार ७८८ शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाणे वितरित करण्यात येणार आहे. तेलबिया उत्पादन वाढीस चालना देण्यासाठी आणि देशातील आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या सहकार्याने हे महत्त्वाकांक्षी अभियान राबवले जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या शेताचा माती परीक्षण अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
-
या योजनेसाठी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर केले होते. निर्धारित लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्याने पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय सोडत (लॉटरी) पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला सोयाबीन बियाण्याच्या तीन पिशव्या मोफत दिल्या जाणार आहेत.
-
माती परीक्षण गरजेचे
शेतीचे आरोग्य समजून घेणे आणि खतांचा अवाजवी वापर टाळून योग्य व्यवस्थापन करणे आजच्या काळात गरजेचे झाले आहे. त्यामुळेच कृषी विभागाने या मोफत बियाणे वाटपासाठी माती परीक्षण अहवाल जोडण्याची अट घातली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्नवाढीला मोठा हातभार लागणार आहे. तेलबिया व कडधान्य उत्पादन वाढवून उत्पादनात स्वयंपूर्णता साधणे, हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी एकूण एक हजार ७८.९१ क्विंटल बियाण्यांचे वितरण होणार आहे.
---
१४-१
...चौकट...
१४-१
तालुकावार लाभार्थी आणि बियाणे लक्षांक (क्विंटल)
तालुका...........निवडलेले लाभार्थी.........बियाणे लक्षांक
साक्री.............१,३३४..........................९७५
शिरपूर............२१०.............................
धुळे...............१७२.............................
शिंदखेडा..........७२..............................
जिल्हा.............१,७८८.........................१,०७८.९१
--