एक्याण्णव वर्षांच्या आजोबांसह विहीरीत कोसळलेले तिघे सुखरुप

एक्याण्णव वर्षांच्या आजोबांसह विहीरीत कोसळलेले तिघे सुखरुप
Published on
NSK26H22468, NSK26H22471 जळगाव : विहिरीत उतरताना अग्निशमन दलाचे अधिकारी अश्‍वजित घरडे. दुसऱ्या छायाचित्रात जखमींना रुग्णालयात आणताना नागरिक. ------------- विहिरीत कोसळलेले आजोबांसह तिघे सुखरूप -------- वीजपंप काढताना स्लॅब ढासळला; रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी, जखमींवर उपचार सुरू सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : घरगुती वीजपंप काढताना विहिरीवरील सिमेंटचा ढापा तुटल्याने दोन तरुणांसह ९१ वर्षीय आजोबा विहिरीत कोसळले. लोखंडी अँग्ल व तुटलेला ढापा अंगावर पडल्याने रामलाल हिरामण भावसार (वय ९१), त्यांचा नातू सिद्धेश महेंद्र भावसार (२४) व शेजारी दर्शन ऊर्फ देव राजेंद्र खाचणे (२३, तिघे रा. गणेशवाडी) जखमी झाले. या दुर्घटनेत सुदैवाने तिघांचे जीव वाचले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी (ता. २४) दुपारी चारच्या सुमारास गणेशवाडीत घडली. घराबाहेरील कंपाऊंडमध्ये घरगुती विहिरीतील वीजपंप दोरीच्या सहाय्याने आजोबा व नातून बाहेर काढत होते. पंप वजनदार असल्याने शेजारी राहणारा दर्शन खाचणेही त्यांना मदत करीत होता. तिघेही उभे असलेल्या विहिरीवरील स्लॅब जीर्ण झाल्याने अचानक कोसळून तिघेही विहिरीत कोसळले. मोठा आवाज झाल्याने घरातील सदस्य व इतर मदतीला धावून आले. मदतीसाठी आरडाओरड केल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली. घटनेची माहिती अग्निशमन दलासही देण्यात आली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत त्यांनी दोरी व शिडीच्या मदतीने विहिरीत उतरून बचावकार्य सुरू केले. सुरुवातीला खुर्चीला दोरी बांधून रक्तबंबाळ अवस्थेत सिद्धार्थ भावसार याला बाहेर काढले. त्यानंतर रामलाल भावसार व नंतर दर्शन खाचणेलाही बाहेर काढून तिघांनाही तातडीने रुग्णालयात नेले. तिघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अग्निशमन दलाची तत्परता जखमींना बाहेर काढण्यासाठी पथकातील भारत बारी, देवीदास सुरवाडे, निवांत इंगळे, रोहिदास चौधरी, तेजस जोशी, सुमित साळवे, यश मनोरे, चेतन सपकाळे, विठ्ठल पाटील, ऋषिकेश वाघ यांनी परिश्रम घेतले. घटनास्थळी महापौर दीपमाला काळे यांनी भेट देऊन माहिती जाणून घेत बचावकार्य करणाऱ्या पथकाचे कौतुक केले. ------- कोट अग्निशमन दलाचे मनापासून कौतुक. अधिकारी अश्‍वजित घरडे यांनी तत्काळ विहिरीत उतरून जखमींना बाहेर काढण्यासाठी समयसूचकता दाखविली. त्यामुळे तिघांचे जीव सुखरूप आहेत. जळगाव शहरातील सर्वच विहिरींचे सर्वेक्षण करून उघड्या विहिरी बंदिस्त करण्याबाबत सूचना देणार आहे. - दीपमाला काळे, महापौर, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com