‘खानदेश एक्स्प्रेस वे’ ठरणार विकासाचा राजमार्ग

‘खानदेश एक्स्प्रेस वे’ ठरणार विकासाचा राजमार्ग
Published on
टुडे १, मेन ------- सूचना : समृद्धी महामार्गाला जोडणारा जळगाव ते छत्रपती संभाजीनगर प्रस्तावित ‘खानदेश एक्स्प्रेस वे’चे एआय चित्र वापरावे. ----- ‘खान्देश एक्स्प्रेस वे’ ठरणार विकासाचा राजमार्ग उपशीर्षक ‘समृद्धी’शी कनेक्ट; मुंबई, पुण्यासह नागपूरला सहा तासांत पोचता येणार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ : मुंबई, नागपूर आणि पुण्याला जळगावकरांना अवघ्या सहा- साडेसहा तासांत पोहोचता येईल, अशी दळवळणाची सुविधा उपलब्ध करुन देणारा ‘खानदेश एक्स्प्रेस वे’ हा सहापदरी महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातून शंभर किलोमीटर अंतर पार करुन थेट ‘समृद्धी’ महामार्गाशी हा रस्ता जोडला जाणार असून या महत्त्वांकाक्षी रस्त्याच्या पूर्णत्वानंतर तो खानदेशसाठी विकासाचा राजमार्ग ठरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींनी मंत्री, लोकप्रतिनिधींकडे अशा स्वरुपाच्या रस्त्यासाठी आग्रह धरला होता. सध्या अस्तित्वात असलेला जळगाव- संभाजीनगर महामार्ग चौपदरी असला तरी अजिंठा घाटातील एकेरी रस्त्यामुळे दीडशे किलोमीटर अंतरावरील संभाजीनगर गाठण्यासाठीही चार- पाच तासांचा कालावधी लागून जातो. त्यामुळे या रस्त्याशिवाय थेट समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी वेगळा रस्ता प्रस्तावित करावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. असा असेल प्रस्तावित ‘खानदेश एक्स्प्रेस वे’ समृद्धी महामार्गाशी जोडला जाणारा प्रस्तावित रस्ता जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल तालुक्यासह जळगाव तालुका, पाचोरा व जामनेर तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड तालुक्यातून मार्गक्रमण करुन समृद्धी महामार्गाशी सावंगीजवळ जोडला जाईल. जळगाव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधील सुमारे ६३ गावांच्या शिवारातून हा रस्ता १०५ किलोमीटर अंतर कापत समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे. रस्त्याच्या मार्गात जिल्ह्यातील गावे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, जळगाव आणि पाचोरा तालुक्यातील गावांमधून या रस्त्याचे मार्गक्रमण होईल. या तीन तालुक्यांमधील ३१ गावांच्या शिवारातून रस्ता जाईल. धरणगाव तालुका : टहाकळी, पाळधी खुर्द व पाळधी बुद्रुक. एरंडोल तालुका : सावदे प्र.चा., पिंपळकोठे प्र.चा., खेडी खुर्द, रवंजे खुर्द जळगाव तालुका : लमांजन, कुऱ्हाडदे, वाकडी, म्हसावद, बोरनार, डोमगाव, पाथरी पाचोरा तालुका : सामनेर, लासगाव, आसनखेडे, नांद्रा, पहान, मोहाडी, नाईकनगर, सांगवी प्र. लोहारे, लासगाव, लोहारी बु., वरखेडी बुद्रुक, लाहुरे, वाणेगाव, राजुरी बी. वाडी, शिंदाड, गहुले. -------- शंभर किलोमीटर अंतर तासाभरात होणार पार धरणगाव तालुक्यातील टहाकळी या गावापासून एरंडोल, जळगाव, पाचोरा या तालुक्यांमधील गावांमधून जात संभाजीनगर जिल्ह्यातील सावंगीपर्यंत १०५ कि.मी. अंतर पार करत समृद्धी महामार्गाशी हा रस्ता जोडला जाईल. सहापदरी रस्त्याचे स्वरुप असल्याने ताशी १२० किलोमीटर वेगाने जळगाव जिल्ह्यातून अवघ्या तासाभरात समृद्धी महामार्गावर जाता येणार आहे. समृद्धीवरुन नागपूर व मुंबई अशा दोन्ही दिशांना पाच- साडेपाच तासांत तर पुढे संभाजीनगर- पुणे ग्रीनफिल्ड रस्त्याने पुण्यातही पाच तासांत पोहोचता येणार आहे. -------- सहापदरी कॉंक्रिट रस्त्यावर ९ हजार कोटींचा खर्च जळगाव ते संभाजीनगरला जोडणारा हा ‘खानदेश एक्स्प्रेस वे’ सहापदरी असेल. १०५ किलोमीटरच्या या रस्त्यासाठी सुमारे ९ ते १० हजार कोटींचा खर्च येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) हा रस्ता तयार करणार असून त्यामुळे जळगाव जिल्ह्यातह खानदेशातील धुळे व नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यातील दळणवळण अधिक सोयीचे होणार आहे. खानदेशातील कृषी, औद्योगिक माल मोठ्या शहरांना पोहोचविण्यासाठी वेळेसह खर्चाची बचत होईल. त्यामुळे खानदेशच्या विकासात मोठी भर पडेल. ---------- पाइंटर ‘खानेश एक्स्प्रेस वे’ दृष्टीक्षेपात टप्पा : जळगाव ते समृद्धी महामार्ग स्वरुप : सहापदरी कॉंक्रिटचा रस्ता तालुक्यांमधून जाणार : धरणगाव, एरंडोल, जळगाव, पाचोरा, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, संभाजीनगर एकूण अंतर : १०५ किलोमीटर एकूण खर्च अपेक्षित : ९ हजार कोटी ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com