ॲंकर
स्केच किंवा एआय वापरता येईल
---
दोन दिवसांत तापमानात तब्बल ८ अंशांची घसरण
(उपशीर्षक)
बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम; पारा आला ४१ वरून ३३ अंशांवर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २५ : पंधरा दिवस उशिराने आलेल्या पावसाने वातावरणात मोठा बदल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी ४१ अंशांपर्यंत असलेल्या तापमानात गेल्या दोन दिवसांत तब्बल ८ अंश सेल्सिअसची घसरण झाली आहे. हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, तापमानातील झालेला अचानक बदल आरोग्यासाठी त्रासदायक ठरत असून सर्दी, ताप, अंगदुखीचा त्रास अनेकांना होत आहे.
जून महिन्यातील पहिल्या तीन आठवड्यात मे हिटचाच तडाखा सहन करावा लागत होता. जळगाव जिल्ह्यातील तापमान सातत्याने ४० अंशाच्या वर राहिले. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तर पारा ४२ अंशांपर्यंत गेला होता. यामुळे कधी नव्हे ते जून महिन्यात देखील उष्णतेच्या झळा जाणवत होत्या. यासोबत हवेतील आर्द्रता वाढल्याने उकाड्यात देखील प्रचंड वाढ झाली होती. परंतु, तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून पावसाचे देखील आगमन झाले आहे. यामुळे तापमान ३३ अंशांपर्यंत खाली आले आहे. काही दिवसांपूर्वी तीव्र उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता तुलनेने थंड वातावरणाचा अनुभव येत आहे.
उष्णतेतून अचानक गारवा
गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक भागांत तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचले होते. तर काही भागात ४१ अंशांपर्यंत पारा होता. मात्र सोमवारपासून ढगाळ वातावरण, वाऱ्याचा वेग वाढणे आणि काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली. तर दोन दिवसांपासून पाऊस जिल्ह्यात सक्रिय झाला असल्याने दोन दिवसांत ८ अंशांची घसरण नोंदविण्यात आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
चौकट
बदलाचा आरोग्यावर परिणाम
एकवेळ तापमान ४० अंशांच्या वर असताना आता हेच तापमान ३३ अंशांवर आले आहे. या हवामानातील अचानक झालेल्या बदलामुळे शरीराला नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. सद्यस्थितीला अनेकांना सर्दी, खोकला, ताप, घशात खवखव, डोकेदुखी आणि अंगदुखीचा त्रास जाणवत आहे. यामुळे दवाखान्यात देखील गर्दी होऊ लागली आहे.
––––
कोट
वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे शरिराला वातावरणाशी जुळून घ्यायला थाेडा वेळ लागतो. ही परिस्थिती सध्या निर्माण झाली असून, वातावरण अचानक थंड झाल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने रूग्ण संख्या वाढली आहे.
- डॉ. राहुल पाटील, जनरल फिजिशियन.
–