मेहरुण चौपाटीवर पिस्तुलधारी गुंडची दहशत

मेहरुण चौपाटीवर पिस्तुलधारी गुंडची दहशत
Published on
फोटो येणार आहे --- गावठी कट्टा घेऊन तरुणाची दहशत; मेहरुण चौपाटीवर दोघांना अटक एमआयडीसी पोलिसांची कारवाई सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ : शहरातील मेहरुण तलाव काठावरील पक्षीघर टॉवरजवळ संशयितरित्या फिरणाऱ्यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून पोलिसांनी गावठी कट्टा जप्त केला असून, त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील मध्यवर्ती पर्यटनस्थळ म्हणून मेहरुण तलावाचा परिसर ओळखला जातो. मेहरुण तलावाच्या काठावर विकसित करण्यात आलेल्या ट्रॅकवर पहाटेपासून सायंकाळपर्यंत मॉर्निंग वॉकसह, पक्षी निरीक्षक आणि पर्यावरणप्रेमींचा राबता असतो. सोबत प्रेमीयुगल, विवाहित जोडपी निवांत क्षणासाठी या चौपाटीवर येतात. अशा परिस्थितीत लूटमार, आणि गैरकृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचाही वावर या ठिकाणी वाढीस लागला आहे. गेल्या दोन महिन्यात मेहरुण चौपाटीच्या परिसरात चाकूहल्ल्यांच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. अशातच मेहरुण चौपाटीच्या पक्षीघर परिसरात एक तरुण गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. चौकट गावठी कट्टा विकणाराही ताब्यात यावेळी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत समीर खान जावेद खान (वय २५, रा. बिलाल चौक, तांबापुरा) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गावठी कट्टा जावेद शेख सलिम शेख (दत्तनगर मेहरुण) याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com