धुळे : टुडे पान ३ साठी..
--
फोटो क्रमांक : 22481
मेहेरगाव (ता. धुळे) : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बसविण्यात आलेल्या नव्या ट्रान्सफॉर्मरच्या उद्घाटनवेळी उपस्थित दिनेश भामरे, राजेंद्र भामरे, युवराज भामरे, भगवान भामरे, शरद भामरे, मनोहर भामरे, दिलीप भामरे आदी.
--
चार गावांमधील वीज प्रश्न तातडीने मार्गी
--
आमदार भदाणे यांच्या सूचनेनंतर कार्यवाही; शेतकऱ्यांची समस्या सुटली
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २५ : धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या पाठपुराव्यामुळे धुळे तालुक्यातील कापडणे, न्याहळोद, वलवाडी आणि मेहेरगाव परिसरातील प्रलंबित वीज प्रश्न अवघ्या काही दिवसांत सुटले. यामुळे शेतकरी व नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. आमदार भदाणे यांनी आतापर्यंत ७२ पेक्षा अधिक नवे ट्रान्सफॉर्मर बसविले असून, १०० पेक्षा अधिक ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवली आहे.
-
कापडणे (ता. धुळे) येथील शेतशिवारात जुन्या ट्रान्सफॉर्मरवरील भार वाढल्याने वारंवार वीज खंडित होत होती. शेतकऱ्यांची कैफियत ऐकल्यानंतर आमदार भदाणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश दिले. त्यांच्या सूचनेनंतर महावितरणने अवघ्या २४ तासांत १०० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवला. यामुळे विहिरींवरील मोटारी सुरळीत होऊन पिकांना पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला. आमदारांचे प्रतिनिधी सचिन भदाणे व कुलदीप अहिरराव हे स्वतः या समस्यांवर लक्ष ठेवून आहेत. तर वलवाडी (ता. धुळे) उपनगरातील राजाराम पाटील नगर, सूर्यभान नगर, आधार नगर आणि नर्मदा नगर परिसरातील कमी व्होल्टेजचा प्रश्न आमदारांच्या निर्देशानंतर अवघ्या चार दिवसांत २०० केडब्लूचा मोठा ट्रान्सफॉर्मर बसवून सोडविण्यात आला. रोहन बोरकुंडकर, शिवकिरण पाटील, हर्षल देशमुख, अक्षय पाटील, नितिन पाटील, आप्पा सोनवणे, श्री. मगर, निंबा गोसावी, एस. एन. पाटील, हिरालाल मासुळे आदींनी समाधान व्यक्त केले.
मेहेरगाव (ता. धुळे) येथेही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केवळ ४८ तासांत ६३ केव्हीएचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला. या नव्या ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन उपसरपंच दिनेश भामरे यांच्या हस्ते झाले. राजेंद्र भामरे, युवराज भामरे, भगवान भामरे, शरद भामरे, मनोहर भामरे, दिलीप भामरे, जयवंत भामरे, सुनील भामरे, सागर भामरे, मधुकर भामरे आदी शेतकरी उपस्थित होते. तर न्याहळोद (ता. धुळे) येथील प्रभाग तीन मधील खोलगल्ली भागात लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे अपघाताची भीती होती. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर आमदारांनी तातडीने दोन नवीन वीजखांब बसवून वीज तारा व्यवस्थित करून दिल्या.