धुळे : टुडे पान ४ साठी..
--
फोटो क्रमांक : 22500
शेवाळी (दा.) : छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात शिव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने झालेल्या विद्यार्थी गुणगौरववेळी उपस्थित डॉ. अनिल नांद्रे. शेजारी माधवराव नांद्रे, राकेश साळुंके, कारभारी साळुंके, सुनीता नाईक आदी.
--
मोठी स्वप्ने पहा, जिद्दीने पूर्ण करा
--
डॉ. अनिल नांद्रे : शेवाळीत विद्यार्थ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. २५ : विद्यार्थ्यांनी जीवनात नेहमी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले पाहिजेत. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वास या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन डॉ. अनिल साहेबराव नांद्रे यांनी केले.
शेवाळी (दा.) (ता. साक्री) येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात शिव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने झालेल्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मधील यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते माधवराव नांद्रे, राकेश साळुंके, कारभारी साळुंके, प्रवीण साळुंके, सचिन साळुंके, मुख्याध्यापिका सुनिता नाईक, शिक्षक गिरीश रामोळे, नाना मारनर, अमोल देसले, रिजवान सय्यद आदी उपस्थित होते. परीक्षेत ९३.८० टक्के गुण मिळवून प्रथम आलेला मानव सचिन साळुंके, ९२.४० टक्के गुणांसह द्वितीय आलेली पलक किशोर मोरे आणि तृतीय क्रमांक मिळवलेली कृतिका सतीश साळुंके यांच्यासह विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.