ज्ञान प्रबोधन उपक्रम

ज्ञान प्रबोधन उपक्रम
Published on
सिंगल कॉलम ज्ञान प्रबोधन उपक्रमात व्यक्तिमत्त्वावर मार्गदर्शन जळगाव : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ला. ना. सार्वजनिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी संस्थेमार्फत ‘ज्ञान प्रबोधन’ कार्यक्रम आयोजित केला होता. यात विद्यार्थ्यांना विविध बौद्धिक, शैक्षणिक, सर्जनशील तसेच व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित उपक्रमांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. ला. ना. विद्यालयाच्‍या गंधे सभागृहात सदर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन ज्ञान प्रबोधिनी पुणे यांच्या प्रशिक्षित मार्गदर्शक नचिकेत नित्युरे, मानसी बोडस, सुधा रहाणे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नवीन विचार, ज्ञान आणि जीवनमूल्यांची प्रेरणा मिळाली. याप्रसंगी मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखडे, पर्यवेक्षिका रमा तारे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com