संविधान संरक्षण समिती निदर्शने

संविधान संरक्षण समिती निदर्शने
Published on
धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H22485 धुळे : पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात उपस्थित धुळे जिल्हा संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते. --- पोलिसांना आठ तास ड्यूटीसह वेतनश्रेणी सुधारा --- संविधान संरक्षण समितीच्या मागण्या; एसपींना निवेदन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २५ : पोलिसांना आठ तासांची ड्युटी लागू करावी, त्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करावी व विविध कल्याणकारी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्या धुळे जिल्हा संविधान संरक्षण समितीने मुख्यमंत्र्यांकडे केल्या. मागण्यांचे निवेदन पोलिस अधीक्षकांना दिले. संविधान संरक्षण समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास निश्चित करण्याबरोबरच त्यांना दरमहा सार्वजनिक सुट्टी द्यावी तसेच वर्षभरात ४८ दिवसांची रजा मंजूर करावी. आठव्या वेतन आयोगानुसार महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही वेतनश्रेणी लागू करून वेतन निश्चित करावे तसेच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना भरती प्रक्रियेत २० टक्के आरक्षण द्यावे, पोलिस कल्याण निधीचे उत्पन्न वाढवावे आणि या निधीतून पोलिसांच्या मुलांच्या वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती व शुल्क सहाय्याची तरतूद करावी आदी मागण्या समितीने केल्या आहेत. कर्तव्य बजावताना पोलिसांवर राजकीय हस्तक्षेप होऊ नये आणि त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. समितीचे हरिश्चंद्र लोंढे, जी. डी. जाधव, बी. बी. वानखेडे, गो. पी. लांडगे, मोहम्मद जैन, जमिल मन्सुरी, पी. टी. बेडसे, एम. एच. मोहिते, एल. आर. राव, श्रीकृष्ण बेडसे, महेंद्र पाटील, राजेंद्र अहिरे, दीपक सोनवणे आदींनी मागण्यांचे निवेदन दिले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com