सन्मती विद्यालयास प्रमाणपत्र

सन्मती विद्यालयास प्रमाणपत्र
Published on
धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H22487 धुळे : मान्यवरांच्या हस्ते दिशा इम्प्लिमेंट स्कुल प्रमामपत्र स्वीकारतांना सन्मती मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक रुपेश माळी, विशेष शिक्षक योगेंद्र पाटील. --- सन्मती विद्यालयास दिशा प्रमाणपत्र प्रदान --- विशेष शिक्षकांना प्रशिक्षण सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २५ : श्री राधेगोविंद बहुउद्देशीय संस्था धुळे संचलित देवपूरातील सन्मती मतिमंद विद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ‘निपिड-दिशा’ अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाचे सर्व निकष व टास्क उत्कृष्ट आणि यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल ‘दिशा इम्प्लिमेंट स्कुल प्रमाणपत्र’ देऊन गौरविण्यात आले. बुधवारी (ता. २४) संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह येथे जय वकील फाउंडेशन (मुंबई) अंतर्गत ‘निपिड-दिशा अभियान’ अभ्यासक्रमावर आधारित, नवीन शैक्षणिक वर्ष २०२६- २७ ची मुख्याध्यापक प्रशिक्षण बैठक झाली. या बैठकीत हा सन्मान प्रदान करण्यात आला. आर. जी. पावरा, सुनील वाघ, दिशा राज्यसमन्वयक निलेश चव्हाण, नाशिक झोनचे समन्वयक अजित खाटीक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याचे समन्वयक भरत साळुंके, कोकण विभागाच्या समन्वयक स्नेहल बाटीक यांच्या हस्ते सन्मती विद्यालयाचे मुख्याध्यापक रुपेश माळी, विशेष शिक्षक योगेंद्र पाटील यांनी प्रमाणपत्र स्वीकारले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. तोरवणे, सचिव श्रीमती तोरवणे यांनी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. शिक्षकांना प्रशिक्षण धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील बौद्धीक अक्षम विद्यार्थ्यांच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, विशेष शिक्षक प्रशिक्षणाला उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान उपस्थितांना दिशा पोर्टलवर झालेले नवीन तांत्रिक बदल समजावून सांगण्यात आले. तसेच, आयईपी (Individualized Education Program) चेकलिस्ट मधील बदल आणि नवीन पद्धतीने आईपी स्कोरींग कसे करावे, प्रात्यक्षिके व ॲक्टिव्हिटी हे बदल आत्मसात करून आईपी अधिक सहज, सोप्या आणि प्रगतशील पद्धतीने कशी पूर्ण करावी, यासाठी विविध प्रात्यक्षिके आणि ॲक्टिव्हिटी घेण्यात आल्या. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com