अडीच वर्षाच्या मुलासह आई बेपत्ता

अडीच वर्षाच्या मुलासह आई बेपत्ता
Published on
NSK26H22507 : अनिता केदार NSK26H22508 : आयुष्मान केदार --- चाळीसगाव रेल्वेस्थानकावरून मुलासह आई बेपत्ता सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. २५ ः येथील रेल्वेस्थानकावरून अडीच वर्षांच्या मुलासह २९ वर्षीय आई बेपत्ता झाल्याची नोंद रेल्वे पोलिसांत झाली आहे. २० जूनला सकाळी नऊच्या सुमारास अनिता लक्ष्मण केदार (वय २९) व त्यांचा मुलगा आयुष्मान (अडीच वर्षे) यांना अनिता यांच्या भावाने नाशिककडे जाणाऱ्या भुसावळ मेमो गाडीत बसविले व ते घरी निघून आले. मात्र, दोन्ही मायलेक नाशिकला घरी आले नाहीत. त्यामुळे अनिता यांच्या पतीने त्यांचे सासरे महादू खैरे यांना ‘तुमची मुलगी व नातू घरी पोहोचलेले नाहीत’ असे सांगितले. अनिता यांच्या भावाने लगेचच आपल्या बहिणीला कॉल केला असता, त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे भावाने इतर नातेवाइकांकडे बहीण व भाचा आले आहेत का, म्हणून विचारणा केली असता, ते कोणाकडेही नव्हते. अनिता यांचा मुलगा आयुष्मान याच्या मानेजवळ गाठ असल्यामुळे त्या उपचारासाठी मजरे (ता. चाळीसगाव) गावी आल्या होत्या. त्या आपल्या मुलासह पतीकडे नाशिकला न पोहोचल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी दोघांचा सर्वत्र शोध घेतला असता, दोघेही मिळून आले नाहीत. यामुळे ते हरविल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून येथील रेल्वे पोलिसांत मायलेक हरविल्याची नोंद झाली आहे. अनिता केदार रंगाने गोऱ्या, उंची पाच फूट, बांधा मध्यम, नाक लांब, डोळे काळे, डोक्याचे केस लांब काळे आहेत. त्यांना मराठी व अहिराणी भाषा बोलता येते, तर त्यांचा मुलगा आयुष्मान याचा चेहरा गोल, रंगाने सावळा, उंची अडीच फूट, कानात बाळी, हातात दोन चांदीची कडी आहे. वरील वर्णनाचे कोणाला कुठेही आढळून आल्यास, त्यांनी येथील रेल्वे पोलिसांसह जवळच्या पोलिसांना कळवावे, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com