धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H22512
धुळे : एकल महिला दिवसानिमित्त महापालिकेत आयोजित कार्यक्रमाला उपस्थित महिला.
---
महापालिकेत एकल महिला दिवस
---
आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २५ : महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे यांच्या निर्देशानुसार धुळे महापालिकेच्या महिला व बालविकास विभागामार्फत आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त २३ जूनला महापालिकेत ‘एकल महिला’ दिवसानिमित्त कार्यक्रम झाला.
धुळे महापालिकेतील स्व. अटल बिहारी वाजपेयी सभागृहात हा कार्यक्रम झाला. महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, महिला व बालकल्याण सभापती उज्वला ठाकरे, सहायक आयुक्त डॉ. सोनाली देवरे, समाज विकास अधिकारी मीना सातभाई, आरोग्याधिकारी डॉ. संपदा कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमात महिला व बालविकास अधिकारी गिरीश जाधव तसेच विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. या वेळी पाच यशस्वी एकल महिलांनी मनोगतातून आपल्या संघर्षमय जीवनप्रवास मांडला. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून धुळे महापालिकेतर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महापौर श्रीमती परदेशी यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित एकल महिलांनी आपल्या अडीअडचणी व समस्या मांडल्या. त्यामध्ये महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, घरगुती उद्योगांना बाजारपेठ व विपणन सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन मिळण्यासाठी सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची मागणी केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील सरदार, धम्मदीप सावंत, सुनीता निकम, छाया पाटील यांचे सहकार्य लाभले. मोहन गवळी व संगीता जांभळे यांनीही कार्यक्रमासाठी विशेष योगदान दिले.
---