जिल्हा टुडे पान चारसाठी
----------------
NSK26H22489
-----
ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेसह
लोकशाहीचा करणार अभ्यास
----------
प्रा. डॉ. सुनील नेवे यांचा लंडन अभ्यास दौरा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २५ : राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक, संशोधक व सामाजिक-राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले प्रा. सुनील नेवे हे २६ जून ते ५ जुलैदरम्यान लंडन येथे आयोजित अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. ब्रिटनची संसदीय लोकशाही, राजकीय व्यवस्था, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक धोरणे व प्रशासन यांचा प्रत्यक्ष अभ्यास करणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे.
जगातील सर्वात प्राचीन व प्रभावशाली लोकशाही व्यवस्थांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ब्रिटिश संसदीय परंपरेचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या दौऱ्यात प्रा. नेवे यांना ब्रिटनच्या संसद भवनाला भेट देऊन हाऊस ऑफ कॉमन्स व हाऊस ऑफ लॉर्ड्स यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. तसेच पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, पार्लमेंट स्क्वेअर, वेस्टमिन्स्टर ॲबे या ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन ब्रिटिश लोकशाहीच्या विकासाचा इतिहास जाणून घेता येणार आहे. ब्रिटन आणि भारताच्या राजकीय व्यवस्थांमधील साम्य व भिन्नता यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यावरील निरीक्षणे संशोधनात्मक स्वरूपात मांडण्याचा मानस प्रा. नेवे यांनी व्यक्त केला आहे.