पान-३
हा फोटो सिंगलच वापरा
22516
नाशिक : विशेष मतदारयादी पुनरीक्षण कार्यशाळेत बोलताना अपर तहसीलदार अमोल निकम. शेजारी उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे.
----------------
३६-३
मतदारयादीचे काम गांभीर्याने करा
-------------
अर्पिता ठुबे ः बीएलओंच्या प्रशिक्षणावेळी निर्देश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २५ : भारत निवडणूक आयोगाच्या मतदारयाद्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) मतदारयाद्या अचूक, निर्दोष व अद्ययावत करणे हे ध्येय आहे. हे काम राष्ट्रीय कर्तव्य असल्याने ते गांभीर्यपूर्वक पूर्ण करावे, असे निर्देश उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे यांनी बीएलओंना दिले. मॅपिंग बाकी असणाऱ्या मतदारांनी तातडीने ते स्वत:हून करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
शहरातील महाकवी कालिदास कलामंदिरात गुरुवारी (ता. २५) नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे (बीएलओ) एसआयआर प्रशिक्षण झाले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अपर तहसीलदार अमोल निकम व बीएलओ पर्यवेक्षक कुणाल पाटील उपस्थित होते.
श्रीमती ठुबे म्हणाल्या, की दोन दशकांमधील शहरीकरण, रोजगारासाठीचे स्थलांतरण व लोकसंख्येतील बदलामुळे मतदारयाद्यांमध्ये सुधारणा आवश्यक झाल्या आहेत. विशेष मतदारयादी मोहिमेंतर्गत मृत, दुबार तसेच अपात्र मतदारांची नावे वगळून पात्र मतदारांची अचूक नोंद घेतली जाईल. तहसीलदार निकम यांनी सर्व बीएलओ त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक मतदाराच्या घरी प्रत्यक्ष भेट देत माहितीची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
---
विशष मतदार मोहीम
३० जून ते २९ जुलै : घरोघरी नोंदणी व पडताळणी
५ ऑगस्ट : प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करणे
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर : दावे व हरकती स्वीकारणे
३ ऑक्टोबरपर्यंत : दावे-हरकती निकाली काढणे
७ ऑक्टोबर : अंतिम मतदारयादीची प्रसिद्धी
------------