बातमी आवश्यक आहे, दोन कॉलमातच लावावी (विद्यापीठाच्या इमारतीचे छायाचित्र वापरता येईल)
---
बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्ससाठी
विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया
जळगाव, ता.२५ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागामार्फत बी.एस्सी. (ऑनर्स) इलेक्ट्रॉनिक्स या चार वर्षांच्या उद्योगाभिमुख पदवी अभ्यासक्रमासाठी १६ जून २०२६ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रथम तीन वर्षे यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाची नियमित बी.एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स) पदवी प्रदान केली जाते. त्यानंतर चौथ्या वर्षात उद्योगक्षेत्रातील अप्रेंटिसशिप (उद्योग प्रशिक्षण) पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना बी.एस्सी. (ऑनर्स) इलेक्ट्रॉनिक्स पदवी मिळते, असे या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्यासोबतच मासिक मानधनाची संधीही उपलब्ध होते. विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्समध्ये मेजर तसेच सोलर फोटो होलटाईक किंवा डेटा सायन्स या विषयांपैकी मायनर निवडण्याची सुविधा या अभ्यासक्रमात उपलब्ध आहे. याशिवाय शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणाच्या संधी आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम विशेष उपयुक्त ठरणार आहे. अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील यूजी/पीजी प्रवेश २०२६-२७ विभागात उपलब्ध आहे.
-------