पुरुषोत्तम कडलगला ‘हायकोर्टा’चा दिलासा

पुरुषोत्तम कडलगला ‘हायकोर्टा’चा दिलासा
Published on
३०-२ भाविक फसवणूक प्रकरणी पुरुषोत्तम कडलगला जामीन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २५ : त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांच्या होणाऱ्या लूटप्रकरणी दोन महिन्यांपासून मध्यवर्ती कारागृहात असलेल्या मंदिराचा विश्वस्त व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा पदाधिकारी पुरुषोत्तम कडलग यास मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. .... त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट होऊनही भाविक पोलिसांत तक्रार देत नसल्याने व्हीआयपी दर्शनाचे जणू मंदिर परिसरात पेव फुटले हाेते. त्र्यंबक पोलिसांनी मंदिर परिसरात स्टिंग ऑपरेशन राबवून व्हीआयपी दर्शनातून भाविकांच्या होणाऱ्या आर्थिक लुटीचा पर्दाफाश केला. विशेषत: पोलिसांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मंदिराचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, त्याचे पुतणे ओम व अभिषेक कडलग, एजंट गोटीराम पेहरे, नारायण मुर्तडक यांच्यासह आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. कनिष्ठ व सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर कडलगने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली  होती. त्यावर गुरुवारी (ता. २५) सुनावणी होऊन न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या गुन्ह्यातील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहे. .... १६-१ या आहेत अटी -२५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह पुरुषोत्तम कडलग यास दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी पोलिस ठाण्यात हजेरी बंधनकारक केली आहे. तसेच, गुन्ह्याशी संबंधित चौकशीला सहकार्य करण्यासह या गुन्ह्याशी संबंधित साक्षीदारांवर दबाव न आणण्याच्या अटी-शर्तींवर कडलग यास उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com