यातील फक्त पवार यांचा फोटो घेणे
---------------
22517
नाशिक ः संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याचा आढावा घेताना सीईओ ओमकार पवार.
---------------
पालखी मार्गावरील अडथळे दूर करा
पवार : संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २५ : संत निवृत्तिनाथ महाराज आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकरी बांधव व भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिल्या.
पालखी मार्गावरील स्वच्छता, निर्मलवारी उपक्रमाची आढावा बैठक गुरुवारी (ता. २५) झाली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग) दीपक पाटील, निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंके, पालखी सोहळाप्रमुख मनोजकुमार राठी, सुजित जाजू, अभियंता संदीप सोनवणे, अभियंता रवींद्र महाजन, गटविकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे, रविकांत सानप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, डॉ. चैतन्य बैरागी उपस्थित होते.
निर्मलवारी उपक्रम प्रभावीपणे राबवून पालखी मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पिण्याच्या पाण्याचा नियमित व शुद्ध पुरवठा, तात्पुरत्या स्वच्छतागृहांची उभारणी, कचरा संकलन व विल्हेवाट याबाबत नियोजनबद्ध कार्यवाही करण्यास सांगितले. नाशिक महापालिकेच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी पालखी मार्गात होणारे अतिक्रमण व नाशिक पंचायत समितीसमोरील रस्त्याचे काम तातडीने करण्याबाबतचे निर्देश या वेळी त्यांनी दिले. आरोग्य विभागाने आवश्यक औषधसाठा, वैद्यकीय पथके व आपत्कालीन आरोग्यसेवा सज्ज ठेवाव्यात, असे निर्देश देतानाच पालखी मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
-----------