अभ्यासपूर्ण प्रस्ताव मागवले

अभ्यासपूर्ण प्रस्ताव मागवले
Published on
धुळे ः टुडे १ साठी -- धुळ्यात मंगळवारी जिल्हास्तरीय कार्यशाळा -- एकल महिला धोरण : सुधारणांबाबत अभ्यासपूर्ण प्रस्ताव मागवले सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २५ : विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासन स्वतंत्र व व्यापक एकल महिला धोरण तयार करीत आहे. त्यास अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख स्वरूप देण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातर्फे मंगळवारी (ता. ३०) सकाळी अकराला श्री संतोषीमाता चौक परिसरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळा होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र भामरे यांनी दिली. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार प्रमुख पाहुणे असतील. कार्यशाळेत एकल महिलांच्या समस्या, अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकल महिला, नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आणि विषयतज्ज्ञांनी या धोरण निर्मिती प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. भामरे यांनी केले. महिला धोरण तयार करताना केवळ समस्या मांडण्याऐवजी त्यावरील ठोस उपाय, नवीन योजना, विद्यमान योजनांमधील आवश्यक बदल तसेच कायदे व नियमांमधील सुधारणांबाबत अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. प्रस्तावामध्ये संबंधित विषयाची पार्श्वभूमी, अपेक्षित उपाययोजना, संभाव्य लाभार्थी आणि त्याचे परिणाम यांचा समावेश असावा. कार्यशाळेस उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिक, एकल महिला, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आणि तज्ज्ञांनी आपले अभिप्राय व सूचना ८२०८५ ८९१९५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवाव्यात, असे आवाहन श्री. भामरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com