धुळे ः टुडे १ साठी ..........धुळे कार्यालयाचे काम संपले....शुभरात्री
--
‘शी बॉक्स’ प्रणालीवर नोंदणी करावी
--
आस्थापनांच्या तक्रार निवारण समितीला यंत्रणेचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २५ : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, संरक्षण व निवारण) अधिनियमानुसार प्रत्येक खासगी आस्थापनांमध्ये १० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असतील, अशा सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. तसेच शासकीय व खासगी आस्थापनांनी कार्यालयात गठित केलेल्या तक्रार निवारण समितीची नोंदणी शी-बॉक्स प्रणालीवर (SHE BOX PORTAL) नोंदणी करणे बंधनकारक आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र भामरे यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे का, तसेच तिची नोंदणी शी-बॉक्स पोर्टलवर करण्यात आली आहे का, याची पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, संरक्षण व निवारण) अधिनियम २०१३ ची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, याचीही तपासणी केली जाणार आहे. यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत तपासणी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून, या पथकाकडून जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांची तपासणी सुरू आहे. तपासणी प्रक्रियेदरम्यान सर्व संबंधित आस्थापनांनी तपासणी पथकास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. भामरे यांनी केले आहे.