५३ अभियंत्यांना ऑनलाईन नियुक्तीपत्रे

५३ अभियंत्यांना ऑनलाईन नियुक्तीपत्रे
Published on
टूडे साठी ----------- आचारसंहिता संपताच कामास वेग ५३ अभियंत्यांना ऑनलाइन नियुक्तीपत्रे सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ : विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपताच महापालिका प्रशासनाने भरती प्रक्रियेला गती दिली आहे. ‘टीसीएस’मार्फत झालेल्या अभियंता भरतीत पात्र ठरलेल्या ५३ उमेदवारांना कागदपत्र पडताळणीनंतर ऑनलाइन नियुक्तीपत्रे देण्यात आली आहे. महापालिकेतील अभियंता संवर्गातील ११४ पदांसाठी आणि अग्निशमन विभागातील फायरमन व वाहनचालकांच्या १८६ पदांसाठी ‘टीसीएस’मार्फत नोकरभरती राबवण्यात आली. २४ आणि २५ फेब्रुवारीला नाशिकसह राज्यातील १३ शहरांतील २९ केंद्रांवर लेखी परीक्षा झाली. परीक्षेनंतर उमेदवारांना प्रश्नांवर आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या काळात टीसीएसकडे ३५७ आक्षेप प्राप्त झाले, ज्यांची तज्ज्ञ समितीकडून छाननी करण्यात आली. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गेल्या महिन्यात ११४ अभियंत्यांची निवड यादी जाहीर झाली. त्यातील ५३ उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली असून, ते नियुक्तीसाठी पात्र ठरले. आचारसंहिता संपताच प्रशासनाने या उमेदवारांना तातडीने ऑनलाइन नियुक्तीपत्रे पाठवली. उर्वरित ६१ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी अद्याप सुरू आहे. काही उमेदवारांनी कागदपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितल्याने ही प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, अग्निशमन विभागातील १८६ फायरमन आणि वाहनचालक पदांसाठी लवकरच शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. ------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com