पहिल्‍या विशेष फेरीत सहभागाची बुधवारपर्यंत संधी

पहिल्‍या विशेष फेरीत सहभागाची बुधवारपर्यंत संधी
Published on
पान-२ साठी ----------- लोगो--अकरावी प्रवेशप्रक्रिया -------------- विशेष फेरीत सहभागाची बुधवारपर्यंत संधी उत्तर महाराष्ट्रात तिसऱ्या फेरीत १२ हजार ८०१ प्रवेश निश्‍चित सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ ः अकरावी प्रवेशाच्‍या तिसऱ्या नियमित फेरीत उत्तर महाराष्ट्रात १२ हजार ८०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. प्रवेशाच्‍या पुढील टप्प्‍यात शिक्षण विभागाने पहिल्‍या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्‍यानुसार प्रवेशाच्‍या प्रतीक्षेत असलेल्‍या विद्यार्थ्यांना बुधवार (ता. १)पर्यंत नोंदणी करून या फेरीत सहभागी होता येईल. शुक्रवारी (ता. ३) या फेरीची यादी प्रसिद्ध होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेचे आयोजन शिक्षण विभागातर्फे केले आहे. या प्रक्रियेत यापूर्वी तीन नियमित फेऱ्यांचे प्रवेश झाले आहेत. तिसऱ्या नियमित फेरीच्‍या प्रवेशाची मुदत गुरुवारी (ता. २५) संपुष्टात आली. अन्‍य दोनप्रमाणे या फेरीलाही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबारचा समावेश असलेल्‍या उत्तर महाराष्ट्रातून १२ हजार ८०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले. कोट्याच्‍या जागांतून नाशिक एक हजार ०४४, जळगाव ७०४, धुळे ४८५ तर नंदुरबारला २७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. शिक्षण विभागाने पहिल्‍या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर केले असून, यामध्ये सर्व प्रकारच्‍या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक भरणे किंवा दुरुस्‍ती, अर्जाचा भाग दोन भरणे, तसेच कोट्याच्‍या जागांवर प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. --- १६-१ विशेष फेरीचे वेळापत्रक - ऑनलाइन अर्ज भरणे- १ जुलै सायं. ६ पर्यंत - विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्धी- ३ जुलै - निवड झालेल्‍यांना प्रवेश मुदत- ३ ते ६ जुलै ----- १६-१ कला शाखेला ‘अच्‍छे दिन’ दुसऱ्या फेरीप्रमाणे तिसऱ्या फेरीतही विज्ञान शाखेपाठोपाठ कला शाखेला विद्यार्थ्यांची पसंती मिळाली असून, वाणिज्‍य शाखेतील मोठ्या प्रमाणावर जागा रिक्‍त राहात आहेत. तिसऱ्या फेरीत उत्तर महाराष्ट्रात झालेल्‍या एकूण प्रवेशात विज्ञान शाखेत सहा हजार ३२०, कला शाखेत चार हजार ८६९ प्रवेश झाले असून, तुलनेत वाणिज्‍य शाखेत अवघे एक हजार ६१२ प्रवेश झाले आहेत. जळगावमध्ये तर या फेरीत विज्ञान शाखेत एक हजार १८९ प्रवेश झालेले असताना, त्‍यापेक्षाही अधिक एक हजार ५९३ विद्यार्थ्यांनी कला शाखेला पसंती दिली असून, या शाखेला ‘अच्‍छे दिन’ आले आहेत. ---- जिल्ह्यातील तिसरी फेरी शाखा झालेले प्रवेश विज्ञान ३,०२४ कला १,७३७ वाणिज्‍य १,०२६ ------- उत्तर महाराष्ट्रातील तिसरी फेरी जिल्‍हा प्रवेश संख्या नाशिक ५,७८७ जळगाव ३,१३४ धुळे १,५५८ नंदुरबार २,३२२ ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

BBA, BMS, BBM and Integrated MBA 2026-27: First CAP Round offers admission opportunities to 12,282 students
solapur
admission
admission
Marathi News Esakal
www.esakal.com