राजर्षी शाहू महाराज जयंती

राजर्षी शाहू महाराज जयंती
Published on
--------------- फोटो : H22529, H22528 छत्रपती शाहू महाराज शोषित, वंचितांचे उद्धारकर्ते नीलेश खैरे : शहर काँग्रेसतर्फे जयंतीनिमित्त कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि शोषित, वंचितांचे उद्धारकर्ते होते, असे प्रतिपादन नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष नीलेश खैरे यांनी केले. काँग्रेस भवन येथे नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे शाहू महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना खैरे म्हणाले, शाहू महाराजांना केवळ अभिवादन करून चालणार नाही, तर त्यांचा सर्वधर्म समभावाचा विचार आत्मसात करावा लागेल. या वेळी प्रा. भालचंद्र पाटील यांनी शाहू महाराजांचा सामाजिक समतेचा विचार कायम प्रेरक राहील, असे सांगितले. तर प्रभाकर धात्रक यांनी तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी महाराजांनी बोर्डिंग सुरू करून आदर्श निर्माण केला, असे नमूद केले. कार्यक्रमास कैलास महाले, दत्तात्रेय सोनवणे, उद्धव पवार, पोपटराव नागपुरे, धोंडिराम बोडके, श्याम वाघमारे, संदीप वाघ, दीपक सपकाळे, शिवाजी कहार आदी उपस्थित होते. अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी सूत्रसंचालन केले. सुदेश मोरे यांनी आभार मानले. ----------------- शाहू महाराज यांना महापालिकेत अभिवादन महापालिकेतर्फे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे महाराजांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे व उपायुक्त नितीन नेर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास कार्यकारी अभियंता सचिन जाधव, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, महेंद्र केंदळे, मिलिंद राजगुरू, साहेबराव भोसले, राहुल उन्हाळे, संकेत घोलप, रमेश पागे, विजय निचीते, मयूर भदाणे, अश्विनी आवटे, पायल शेजवळ, वैशाली पगारे, राजश्री अवचिते, गणेश देवरे, पल्लवी आव्हाड, शकुंतला साळवे, सुरेखा सुपेकर, सुनील भाबड, सुरक्षा विभागाचे अशोक कोरडे, रंजीत रामराजे, संतोष घोडे आदींसह मनपातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com