मनमाड-इंदोर रेल्वेत मालेगावचा अडथळा

मनमाड-इंदोर रेल्वेत मालेगावचा अडथळा
Published on
मालेगावमध्ये संयुक्त मोजणी ठप्प मनमाड-इंदूर रेल्वे : भूसंपादनाच्या दरावरून ‘महसुल’पुढे अडचणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ : बहुचर्चित मनमाड- इंदूर रेल्वेमार्गिकेच्या भूसंपादनासाठी मालेगाव तालुक्यात विरोध होत आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे तालुक्यातील संयुक्त मोजणी थांबली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या अडचणीत भर पडली आहे. केंद्राच्या प्राधान्य यादीत मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग टॉपवर आहे. एकुण ३०९ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याची भाग्यरेषा ठरणारा आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने १८ हजार ३६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. लवकरात-लवकर हा मार्ग उभारणीसाठी केंद्र आग्रही आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिक पातळीवर विरोध होत आहे. जिल्ह्यात नांदगाव तसेच मालेगाव या दोन तालुक्यातून हा मार्ग जाणार असून २२ गावांमध्ये जमीन संपादन करायची आहे. महसूल प्रशासनाने नांदगाव तालुक्यातील संयुक्त मोजणीचे काम पूर्ण केले आहे. पण, मालेगावमध्ये संपादनास स्थानिकांचा तीव विरोध आहे. परिणामी तालुक्यात संयुक्त मोजणीचा काम पूर्णत: ठप्प पडले आहे. शासन भूसंपादनापोटी तुटपुंजा दर देत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. या नाराजीमुळे मालेगाव मध्ये संयुक्त मोजणीला प्रारंभ होऊ शकलेला नाही. परिणामी या मुद्यावर शासन आता कशाप्रकारे मार्ग काढते त्यावरच प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. --- एकुण १४७० गट बाधित या रेल्वेमार्गासाठी मालेगावचे १६ आणि नांदगावमधील ६ गावांमध्ये भू-संपादन करायचे आहे. दोन्ही तालुक्यातील एकुण १,४७० गट बाधित होणार असून एकुण ३६३.२६८६ हेक्टरचे क्षेेत्र संपादित करायचे आहे. नांदगावमधील सहाही गावांतील ३०५ गटांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून हे क्षेत्र ६८.८७८१ हेक्टर आहे. मात्र, मालेगावमध्ये विरोधामुळे संयुक्त मोजणीला ब्रेक लागला आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com