राष्ट्रीय महाअधिवेशन

राष्ट्रीय महाअधिवेशन
Published on
टूडे साठी --------------- छावा क्रांतिवीर सेनेचे नाशिकमध्ये उद्या अधिवेशन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ : छावा क्रांतिवीर सेनेचे १२ वे राष्ट्रीय महाअधिवेशन रविवारी (ता. २८) सायंकाळी ६ वाजता रावसाहेब थोरात सभागृह येथे होणार आहे. संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या अधिवेशनात मनोज जरांगे-पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग आणि ‘छावागौरव पुरस्कार’ वितरण होणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत करणार असून कामगार नेते अभिजित राणे अध्यक्षस्थानी असतील. माँ मातंगी धामचे डॉ. प्रेमासाई महाराज यांची विशेष उपस्थिती राहील. मंत्री दादा भुसे, सुहास कांदे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, सुनील बागुल, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात शेतकरी, विद्यार्थी, महिला प्रश्नांसाठीच्या लढ्याचा आढावा घेतला जाणार आहे. नाशिक रिंग रोड प्रकल्पग्रस्त, कर्जमाफी, घरकुल गैरव्यवहार, स्मार्ट मीटर सक्ती या मुद्द्यांवर संघटनेची भूमिका मांडली जाईल. पुढील आंदोलनाची दिशाही जाहीर होणार आहे. आयोजनासाठी आशिष हिरे, नवनाथ वैराळ, योगेश गांगुर्डे, शिवाजी राजे मोरे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी तयारी करत आहे. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com