NSK26H22535
नंदुरबार : ईव्हीएम ॲपवर मतदान करताना विद्यार्थी.
---
‘ईव्हीएम’ वर मतदान करून
विद्यार्थ्यांनी निवडला वर्गप्रतिनिधी
नंदुरबार, ता. २६ : एकलव्य विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी ईव्हीएम ॲपवर मतदान करून आपले वर्गप्रतिनिधी निवडले. मतदान प्रक्रियेचा विद्यार्थ्यांनी अनुभव प्राप्त केला.
शालेय जीवनात वर्गाचा प्रतिनिधी बनण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ लागलेली असते. यासाठी बऱ्याचदा ही निवडणूक चिठ्ठीवर मतदान करून होत असते. परंतु एकलव्य विद्यालयाच्या दहावी ‘क’च्या वर्गात नवीन प्रयोग राबविण्यात आला. मोबाईलवर उपलब्ध असलेल्या वोटिंग मशिन ॲपवर मतदान घेऊन विद्यार्थी प्रतिनिधीची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी हा एक नवीन अनुभव होता. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया कशी चालते, याचा अनुभव येण्यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्गशिक्षक संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांना मतदान कसे करावे, याबद्दल माहिती दिली. निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, उपमुख्याध्यापक डॉ. गिरीश पवार, पर्यवेक्षक टिका पाडवी यांनी सहभाग घेतला. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत मतदाराला मतदान केंद्रात जावे लागते, त्याच पद्धतीचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आला. या निवडणुकीत विद्यार्थिनींमधून श्वेता पवार वर्गप्रतिनिधी तर रिद्धिमा मालचे उपप्रतिनिधी म्हणून निवडून आल्या. मुलांमधून श्रेयस बोरसे वर्गप्रतिनिधी म्हणून, तर दुर्गेश माळी उपप्रतिनिधी म्हणून निवडून आले.