छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी
Published on
NSK26H22534 नंदुरबार : शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी, डॉ. एम. आर. पाटील, प्रा. डी. ए. पाटील. --- पाटील महाविद्यालयात शाहू महाराज जयंती नंदुरबार : येथील जी. टी. पाटील महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कबचौ उमवि विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य डॉ. एम. आर. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डी. ए. पाटील प्रमुख पाहुणे होते. प्राचार्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांनी सांगितले, की शाहू महाराजांनी समाजासाठी, शिक्षणासाठी, गोरगरीब जनतेसाठी केलेले कार्य समाजाला दिशादर्शक आहे. जयंती उत्सव समितीचे डॉ. उपेंद्र धगधगे यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्य व राष्ट्रासाठी केलेल्या कार्याला उजाळा दिला. डॉ. मनोज शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com