नंदुरबारच्या आदिवासी विद्यार्थ्यांची इस्रो सफर

नंदुरबारच्या आदिवासी विद्यार्थ्यांची इस्रो सफर
Published on
अँकर --- NSK26H22542 नंदुरबार : विक्रम साराभाई स्पेस सेंटरला विद्यार्थ्यांनी भेट दिली, त्या वेळी उपस्थित शास्त्रज्ञ सावन लाखिया, जयदीप पाटील, लक्ष्मण पावरा, मनोहर पाटील, रमेश पाटील आदी. --- नंदुरबारच्या आदिवासी विद्यार्थ्यांची इस्रो सफर नोबेल फाउंडेशन व ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशनचा उपक्रम सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २६ : शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहाशी आदिवासी विद्यार्थ्यांना जोडण्याच्या उद्देशाने नोबेल फाउंडेशन, जळगाव आणि ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशन, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी इस्रोची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे कार्य प्रत्यक्ष पाहण्याची आणि विज्ञान क्षेत्रातील करिअरच्या संधी जाणून घेण्याची संधी मिळाली. प्रशासकीय अधिकारी अजय खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशनने नोबेल फाउंडेशनच्या सहकार्याने ‘नोबेल सायन्स टॅलेंट सर्च’ परीक्षा घेतली होती. या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना अहमदाबाद येथील विक्रम साराभाई स्पेस एक्झिबिशन सेंटरला भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी इस्रोमधील विविध प्रयोगशाळा, अवकाश तंत्रज्ञानावरील प्रदर्शने आणि संशोधनविषयक माहिती जाणून घेतली. तसेच साबरमती आश्रमाला भेट देऊन महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याचा अभ्यास केला. अहमदाबाद सायन्स सिटीमध्ये स्पेस टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, ह्युमन डेव्हलपमेंट, विज्ञान प्रदर्शने आणि अक्वॅटिक पार्कचा अनुभवही विद्यार्थ्यांनी घेतला. अजय खर्डे यांनी नंदुरबारमधील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता असून, योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते राष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. जयदीप पाटील यांनी आदिवासी भागातून भविष्यात अनेक शास्त्रज्ञ घडू शकतात, असे सांगितले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लक्ष्मण पावरा, रमेश पाटील आणि वीरेंद्र पवार यांनी परिश्रम घेतले. अजय खर्डे व डॉ. कांतिलाल टाटिया यांचे मार्गदर्शन लाभले. --- चौकट इस्रोमध्ये पोहोचण्यासाठी स्वप्ने, जिद्द आवश्यक इस्रोचे शास्त्रज्ञ सावन लाखिया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विज्ञान आणि अंतराळ संशोधन क्षेत्रातील करिअरच्या संधींची माहिती दिली. ‘मोठी स्वप्ने, जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कोणताही विद्यार्थी इस्रोमध्ये स्थान मिळवू शकतो. देशसेवेची संधी विज्ञान क्षेत्रातूनही मिळते. माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे संघर्षमय जीवन प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन ध्येय निश्चित करावे," असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनीही इस्रोच्या कार्यपद्धतीविषयी उत्सुकता व्यक्त करत विविध प्रश्न विचारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com