पन्नास टक्के पावसाची तुट

पन्नास टक्के पावसाची तुट
Published on
जिल्ह्यात १५ टक्के बागायती कपाशीची लागवड --- ९३ हजार हेक्टरवरच खरीप पेरणी; पन्नास टक्के पावसाची तूट सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २६ : जिल्ह्यात पावसाचा अपेक्षित जोर नसल्याने अजूनही सरासरी ५० टक्क्यांपेक्षा जास्त तूट कायम आहे. पावसाच्या रेंगाळलेल्या स्थितीमुळे खरिपाच्या पेरण्यांवर थेट परिणाम झाला असून, सात लाख ६३ हजार ४८८ हेक्टरपैकी केवळ ९२ हजार ९२८.३५ हेक्टरवर खरीप वाणांची लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. कपाशीची १५.३ टक्के लागवड जिल्ह्यात सर्वांत जास्त कपाशीची लागवड होते. यंदा पाच लाख ४६ हजार ९३३ हेक्टरवर कपाशीची लागवड अपेक्षित आहे. मात्र, मॉन्सून लांबणीवर पडल्याने आतापर्यंत केवळ ८३ हजार ७५२.६५ हेक्टर अर्थात, १५.३ टक्के कपाशीची लागवड झाली आहे. यात जळगाव २६.५, भुसावळ ९.१, अमळनेर १५.६, चोपडा ११, एरंडोल २०.६, यावल २.२६, रावेर १७.७, मुक्ताईनगर १०.८, पारोळा २२.४, चाळीसगाव १४.४, जामनेर ३.९८, पाचोरा २०.७, भडगाव ४१.३, धरणगाव १३.२, बोदवड १०.३, असे एकूण १५.३ टक्के हेक्टरवर बागायती कपाशीची लागवड आहे. कपाशीवगळता सोयबीन ९२, भुईमूग २४, तूर १०६३.२०, मूग ११३, उडीद ९९, मका ७४८९.८०, बाजरी ४९, ज्वारी ११७.५० हेक्टर, अशी सरासरी कपाशीसह ९२ हजार ९२८.३५ हेक्टरवर खरीप वाणांची पेरणी झाली आहे. खरीप पेरण्या लांबणीवर पडल्याने तसेच पावसाची तूट असल्याने खरीप लागवडीत घट झाली आहे. यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. --- आतापर्यंत झालेला पाऊस असा तालुके--- पाऊस (मिलिमीटर)--- टक्के रावेर--- १२२.९--- ९८.१ मुक्ताईनगर--- ५९.६--- ५८.२ जळगाव--- ८०.६--- ५९.६ भुसावळ--- ३२.६--- २७.० यावल--- ४८.६--- ३८.२ अमळनेर--- २८.६--- २४.९ चोपडा--- ९७.४--- ७६.३ एरंडोल--- ५६.६--- ४४.३ पारोळा--- ५९.५--- ४८.४ चाळीसगाव--- ४२.०--- ३२.५ जामनेर--- ४१.५--- ३०.१ पाचोरा--- ७२.०--- ६२.२ भडगाव--- ३३.६--- २६.४ धरणगाव--- ७४.४--- ५३.१ बोदवड--- ५६.०--- ४५.२ एकूण--- ६१.४--- ४९.६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com