धुळे टुडे २ साठी अँकर...
---
फोटो-NSK26H22540
धुळे : सावली ज्येष्ठ महिला नागरिक संघाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला उपस्थित संघाच्या पदाधिकारी व इतर मान्यवर.
---
ज्येष्ठ नागरिक हे चालती- बोलती विद्यापीठं
---
मान्यवरांच्या भावना; सावली ज्येष्ठ महिला नागरिक संघाचा कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २६ : ज्येष्ठ नागरिक म्हणजे घरातील अडगळ नसून ते घराघरांती अनुभवाचे आणि ज्ञानाचे ते चालते-बोलते विद्यापीठं आहेत, अशा भावना मान्यवरांनी सावली ज्येष्ठ महिला नागरिक संघाच्या कार्यक्रमातून दिला.
धुळ्यातील सावली ज्येष्ठ महिला नागरिक संघाचा १७ वर्धापन दिन २३ जूनला झाला. संघाच्या संस्थापिका जयश्री शहा, अध्यक्षा चंपावती अग्रवाल, सभासद प्रा. सुनंदा वैद्य उपस्थित होते. शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जे. टी. देसले, उपाध्यक्ष ॲड. एम. एस. पाटील, श्री. सूर्यवंशी, साने गुरुजी संघाचे अध्यक्ष श्री. वाणी यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमात बारा वर्षांपूर्वी रोवलेले एक छोटेसे रोपटे आज वटवृक्षाप्रमाणे डेरेदार झाले असून ते शहरातील महिलांसाठी एक हक्काचे विरंगुळा केंद्र बनले आहे, अशा शब्दांत उपस्थितांनी सावली ज्येष्ठ नागरिक संघाचे कौतुक केले.
नर्सिंग होमची गरज
संघाच्या संस्थापिका सौ. शहा यांनी अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. मी स्वतः अवयवदानाचा संकल्प केल्याचे त्यांनी जाहीर करत धुळ्यासारख्या शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र नर्सिंग होमची गरज त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षा सौ. अग्रवाल यांनी संघाच्या कार्यावर प्रकाश टाकत शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
विशेष सत्कार
संघाच्या सभासद प्रा. सौ. वैद्य यांनी ज्येष्ठ नागरिक संघासाठी २५ हजार रुपये देणगी दिली. याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. विमल पवार यांनी अहवाल वाचन केले. शालिनी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. उल्का वणी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगिता नाईक, जयश्री शिंपी, कोकिळा अग्रवाल, शीतल वाणी यांच्यासह इतर भगिनींनी परिश्रम घेतले.
---