अवतीभवती- धुळे टुडे २ साठी...
---
फोटो- NSK26H22545
धुळे : राजर्षी शाहू महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतांना शिवसेनेचे मनोज मोरे, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते.
---------
राजर्षी शाहू महाराजांना
शिवसेनेतर्फे अभिवादन
धुळे : सामाजिक न्याय, शिक्षणाचा प्रसार आणि बहुजनांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर कार्य करणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. २६) शिवसेना कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी युवासेना जिल्हाध्यक्ष योगेश मराठे, जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर, उपमहानगरप्रमुख अजय पाटील, शेखर बडगुजर, दत्ता शिंदे, रवी शिंदे, गोठ्या मराठे, सनी मोरे, प्रवीण चित्ते, आशू भडागे, विशाल सोनवणे, प्रवीण मराठे, नितीन धनगर, साहिल चित्ते, स्वप्नील सोनवणे, जिया अन्सारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---
फोटो- NSK26H22544 (चेतना खिवसरा)
चेतना खिवसरा
सीए परीक्षा उत्तीर्ण
धुळे : निमगुळ येथील चेतना खिवसरा सीए परीक्षा उत्तीर्ण झा लग्नानंतर स्वतःचे करियर करू पाहणाऱ्या महिलांसाठी त्यांचे हे यश प्रेरणा देणारे आहे. चार्टर्ड अकाउंटंट ही परीक्षा देशातील सर्वाधिक कठीण व्यावसायिक परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत, अभ्यासात सातत्य, आत्मविश्वास आणि चिकाटी आवश्यक असते. लग्नानंतर घरातील जबाबदाऱ्या सांभाळत अभ्यासात सातत्य राखणे हे मोठे आव्हान असतानाही चेतना यांनी आपल्या दृढ इच्छाशक्ती आणि समर्पणाच्या जोरावर हे यश संपादन केले. अभ्यासासाठी वेळेचे प्रभावी नियोजन आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यातून त्यांनी सीए परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. त्यांचा हा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी आणि विशेषतः लग्नानंतर शिक्षण व करिअरची स्वप्ने पूर्ण करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या यशात चेतना यांना त्यांचे पती शुभम खिवंसरा व परिवाराचे प्रोत्साहन मिळाले. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
---