विद्यार्थीनींना पास वाटप

विद्यार्थीनींना पास वाटप
Published on
धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H22541 धुळे : तु. ता. खलाने हायस्कूलमध्ये एसटी पास वाटपप्रसंगी लाभार्थी विद्यार्थीनींसह एसटी महामंडळाच्या धुळे विभागातील अधिकारी, शाळेतील शिक्षक- शिक्षिका. --- महाजन हायस्कूलमध्ये विद्यार्थीनींना पास वाटप सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २६ : ग्रामीण भागातून शिक्षणासाठी धुळे शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे मानव विकास व अहिल्याबाई होळकर पास देण्यात येतात. गुरुवारी (ता. २५) शहराच्या देवपूर भागातील तु. ता. खलाने महाजन हायस्कूल येथे विद्यार्थीनींना हे पास वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाचे विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे, आगार व्यवस्थापक पंकज देवरे, वाहतूक नियंत्रक शंकर सगरे, मुख्याध्यापक ए. ए. बागूल, उपमुख्याध्यापिका व्ही. एम. भामरे, पर्यवेक्षिका व्ही. एम. आढावे, परिवहन समिती सचिव एस. यू. माळी, एम. व्ही. जगताप आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या चेहस्ते विद्यार्थीनींना पास वितरण करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ घेऊन नियमित शिक्षणासाठी प्रवास करण्याचे आवाहन केले. मानव विकास व अहिल्याबाई होळकर पास योजनांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित, सुलभ व आर्थिकदृष्ट्या परवडणारी प्रवास सुविधा उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com