धुळे टुडे २ साठी...
---
महिला महाविद्यालयाचे
बीसीए परीक्षेत यश
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २६ : वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित देवपूर भागातील कला, वाणिज्य व बीसीए महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी बीसीए परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले.
बीसीए विद्याशाखेच्या एसवायबीसीए व टीवायबीसीए वर्गाचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात एसवायबीसीएचा निकाल ९५.७८ टक्के, तर टीवायबीसीएचा ९९.२५ टक्के निकाल लागला. टीवायबीसीए वर्गातील प्रथम तीन विद्यार्थीनी : प्रथम- नेहा दिनेश सावंत (८३.००), द्वितीय- पायल वासुदेव बेडसे (८०.७०), तृतीय- नशरा फारुक शेख (८०.१०). एसवायबीसीए वर्गातील प्रथम तीन विद्यार्थीनी : प्रथम- ज्योत्स्ना राजेंद्र पाटील (७८.२७), द्वितीय- प्रांजल विठ्ठल चौधरी (७८.००), तृतीय- उर्मिला विजय पाटील (७७.७३). सर्व विद्यार्थीनींना बीसीए विभागातील प्रा. अनिल माळी, प्रा. अश्विनी ठाकूर, प्रा. किरण कुळथे, प्रा. किरण देवरे, प्रा. प्रियंका नांद्रे, प्रा. सायली पाटील, प्रा. कोमल देशमुख, धनश्री पाटील, प्रा. गायत्री पाटील, प्रा. प्रियंका सूर्यवंशी, राजेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळाच्या अध्यक्षा स्मिता अजमेरा, उपाध्यक्षा मेघा कामेरकर, सचिव ऋषी अजमेरा, सहसचिव अम्रिता अजमेरा, प्राचार्य डॉ. डी. झेड. चौधरी, कार्यलयीन अधीक्षक महेंद्र बागूल, मुख्य लिपिक जयेश ठाकूर व सर्व विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतूक केले.
---