कॅरम लीग स्पर्धेला सुरवात

कॅरम लीग स्पर्धेला सुरवात
Published on
NSK26H22564 जळगाव : जळगाव कॅरम लीग स्पर्धेच्‍या उद्घाटनप्रसंगी आमदार सुरेश भोळे, युसूफ मकरा, अरविंद देशपांडे, ॲड. रवींद्र कुलकर्णी, मंजूर खान, रंगनाथ पाटील आदी. –––– कॅरम लीग स्पर्धेत ५४ खेळाडूंचा सहभाग (उपशीर्षक) आप्पासाहेब लिजेंड्स, लीजर स्टार्स, ‘साईनाथ’, मकरा चॅलेंजर्सची विजयी सुरवात सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २६ : येथे जळगाव कॅरम लीग स्‍पर्धेत आजच्‍ पहिल्‍या दिवशी आप्पासाहेब लिजेंड्स, लीजर स्पोर्ट्स स्टार्स, साईनाथ टायटन्स व मकरा चॅलेंजर्स संघांनी विजयी सुरवात केली. जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीच्‍या विद्यमाने आयोजित व जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड पुरस्कृत जळगाव कॅरम लीग- पर्व २ ही स्पर्धेला सुरवात झाली. आजपासून सुरू झालेली स्पर्धा रविवार(ता. २८)पर्यंत कांताई सभागृह येथे होईल. स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी युसूफ मकरा, अरविंद देशपांडे, ॲड. रवींद्र कुलकर्णी, मंजूर खान, रंगनाथ पाटील, आरीश शेख, आमीर शेख, रेहान सालार, आसीफ खान, अशफाक शेख यांच्यासह आयोजन समितीचे प्रमुख सय्यद मोहसीन, हमिद भुसावली, रवींद्र धर्माधिकारी, हबीब शेख, फजल मोहम्मद, फिरोज खान, शेख अजीज, अताउल्लाह खान यांची उपस्थिती होती. चौकट सामन्यांचे निकाल स्पर्धा प्रथम लीग पद्धतीने व नंतर बाद पद्धतीने खेळविली जात आहे. आज झालेल्‍या लीग पद्धतीच्‍या सामन्‍यांच्‍या पहिल्या फेरीमध्ये आप्पासाहेब लिजेंडस संघाने सालार किंग्ज संघाचा २-१, मकरा चॅलेंजर्स संघाने अरिश लॉयन्स संघाचा ३-० ने, साईनाथ टायटन्स संघाने स्पोर्ट हाऊस स्ट्रायकर संघाच २-१ ने आणि लिजर स्पोर्ट स्टार्स संघाने श्री उत्तम हर्बल रायडर्स संघाचा ३-० ने पराभव करून विजयी सुरवात केली. ––––––––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com