जळगाव शहर टुडे पान चारसाठी
--------------------------
NSK26H22581
जळगाव : कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर.
---------
आणीबाणीतील सत्याग्रहींचा
जळगावात कृतज्ञता सोहळा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२६ : देशात २५ जून १९७५ला लागू करण्यात आलेल्या आणिबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या सत्याग्रहींच्या त्याग, समर्पण व बलिदानाला अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या जळगाव महानगर शाखेतर्फे आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच झाला.
कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व विचारवंत प्रा. रमेश नथू महाजन (धरणगाव) यांनी ''आणीबाणीची दाहकता'' या विषयावर मार्गदर्शन केले. त्यात आणीबाणीच्या काळातील घटनांचा आढावा घेत लोकशाही संस्थांवरील परिणाम व त्या काळातील संघर्षाची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, भाजप महानगरचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी व नितीन इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आणीबाणीच्या काळात बालसत्याग्रही म्हणून सहभागी झालेले ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते उदय भालेराव यांनी उपस्थित सत्याग्रहींची ओळख करून देत त्यांचा सत्कार केला. यावेळी आणीबाणीतील सत्याग्रही व त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याशिवाय महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संयोजक आशिष सपकाळे यांनी केले. हर्षल सिखवाल यांनी आभार मानले. उदय भालेराव, आशिष सपकाळे व हर्षल चौधरी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.