धुळे टुडे ३ संक्षीप्त

धुळे टुडे ३ संक्षीप्त
Published on
धुळे ः टुडे ३ साठी संक्षिप्त......(ग्रामीण किंवा शिरपूर क्राईम जोड असल्यास घ्यावा) -- राऊळनगरात चोरी; किमती ऐवज लंपास धुळे : दोंडाईचा (ता. शिंदखेडा) शहरात धाडसी चोरी उघडकीस आली. चोरट्यांनी घरातील संसारपयोगी साहित्य नेले. ममताबाई गिरासे (रा. जयगंगा सोसायटी, राऊळनगर, दोंडाईचा) यांच्या फिर्यादीनुसार २१ जूनला सायंकाळी गिरासे हे त्यांच्या कुटुंबासह नातेवाइकांकडे कार्यक्रमानिमित्त गेले होते. २२ जूनला सकाळी घरी आल्यानंतर घराच्या दरवाजावरील कडीकोयंडा तुटलेला दिसल्याने घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी घरातून तांबे, पितळ व स्टीलच्या भांड्यांसह शिलाई मशीन, इलेक्ट्रिक शेगडी, असा ऐवज नेला. त्यावरून दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. -- दहा वराह चोरीस; सहा जणांवर गुन्हा धुळे : शेतात सोडलेले दहा पाळीव वराह चोरी झाल्याची तक्रार निजामपूर (ता. साक्री) पोलिस ठाण्यात दाखल झाली. वराहमालक किशोर आनंदा शिंदे (रा. छडवेल कोर्डे, ता. साक्री) यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा वराह पालनाचा व्यवसाय आहे. त्यांनी त्यांच्या शेतात सोडलेले दहा वराह ३० मेस चोरी झाल्याचे त्यांना दिसून आले. चौपाळे (ता. नंदुरबार) येथील रामा भिकन पवार व त्याच्या सोबत आलेल्या चौघांसह नगड (गुजरात) येथील धर्मेश कौतिक शिंदे यांनी ही चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून सहा संशयितांवर गुन्हा दाखल झाला. -- मागील वादातून भावांना मारहाण धुळे : मागील भांडणाच्या वादातून दोन भावांना बेदम मारहाण करत त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून दुखापत केल्याची घटना छाईल (ता. साक्री) येथे घडली. गावातील वाहनचालक अजय संजय बेनपाव यांच्या फिर्यादीनुसार २२ जूनला ते त्याच्या भावासह गावातून जात असताना गावातील गणेश नाना लोणारे, दादू नाना लोणारे व ओम नाना लोणारे यांनी दोघांना अडवले. मागील भांडणाची कुरापत काढून धारदार शस्त्राने हल्ला केला. यात दोघांना डोक्यावर, पाठीवर व हातावर दुखापत झाली. त्यावरून साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. -- पाय घसरून वृद्धाचा मृत्यू धुळे : फागणे (ता. धुळे) गावात पावसामुळे गॅलरीतून घरात जाताना पाय घसरून वरच्या मजल्यावरून खाली ओट्यावर पडल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. गणेश नागराज बडगुजर (वय ६२) असे त्यांचे नाव आहे. २२ जूनला सकाळी सहाच्या सुमारास पाऊस सुरू झाला. त्यावेळी गणेश बडगुजर हे घराच्या गॅलरीत होते. पाऊस आल्याने ते गॅलरीतून उठून घरात येत असताना पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे त्यांचा पाय घसरला. त्यात ते वरच्या मजल्यावरून थेट खाली ओट्यावर कोसळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत धुळे तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com