धुळे ः टुडे ३ साठी, ॲंकर
--
फोटो क्रमांक ः 22583
पाचगणी : सोहळ्यात संजय आवटे यांच्याकडून ग्रामरत्न पुरस्कार स्विकारताना सरपंच नयना पाटील. शेजारी डॉ. संदीप पाटील, जयंत पाटील आदी.
--
नयना पाटील यांचा ग्रामरत्न पुरस्काराने सन्मान
--
मांडळमधील कार्यकर्तृत्वाची अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे दखल
-
किंवा
-
नयना पाटील यांचा ग्रामरत्न पुरस्कार प्रदान
--
मांडळमधील कार्यकर्तृत्वाची अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे दखल
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २६ : अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे मांडळ (ता. धुळे) येथील लोकनियुक्त सरपंच नयना पाटील यांना या वर्षीचा मानाचा महाराष्ट्र ग्रामरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाचगणी (जि. सातारा) येथील सोहळ्यात त्यांना गौरविण्यात आले. सरपंच नयना पाटील यांच्या उल्लेखनीय सामाजिक आणि राजकीय कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
-
ग्रामविकासात नयना पाटील यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. मांडळ येथे त्यांनी २०१२ ते २०१७ या काळात उपसरपंच म्हणून काम पाहिले. नंतर २०१७ ते २०२२ या कालावधीत त्या पहिल्यांदा लोकनियुक्त सरपंच झाल्या. त्यांच्या कामावरील विश्वासामुळे २०२२ ते २०२७ या सलग दुसऱ्या टर्मसाठी त्यांची मांडळच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. सध्या त्या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका, तसेच भाजप महिला मोर्चाच्या धुळे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांना सामाजिक कार्यकर्ते पती डॉ. संदीप पाटील, सासरे प्रा. छबू पाटील यांची साथ लाभत आहे.
-
मांडळचा नावलौकिक
सरपंच नयना पाटील यांच्या नेतृत्वात मांडळने विविध क्षेत्रात यश मिळवले आहे. यात पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत धुळे तालुक्यातून प्रथम, तर आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेत धुळे तालुक्यातूनही मांडळला प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला आहे. तंटामुक्त गाव आणि उत्कृष्ट जलसंधारण गाव म्हणूनही मांडळला गौरविण्यात आले आहे. सोहळ्यास माजी सनदी अधिकारी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, ग्रामविकास अभ्यासक शरद बुट्टे-पाटील, सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील व पदाधिकारी प्रमुख पाहुणे होते. राज्यभरातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. यात ग्रामपंचायतींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर मंथन झाले.