धुळे ः टुडे ३ साठी
--
दोन कॉलमात फोटो क्रमांक ः 22587
धुळे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करताना राजवर्धन कदमबांडे, संदीप पाटील आदी.
--
राजर्षी शाहू महाराज जयंती;
मान्यवरांकडून अभिवादन
-
नेते राजवर्धन कदमबांडे यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २६ : शहरासह जिल्ह्यात आरक्षण संकल्पनेचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शुक्रवारी (ता. २६) जयंती साजरी झाली. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांनी उपस्थित राहून शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण केले. प्रकाश पाटील, माजी महापौर मोहन नवले, सुनील महाले, हरिश्चंद्र वाघ, ज्येष्ठ पत्रकार हेमंत मदाने, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पाटील, बी. ए. पाटील, योगीराज मराठे, साहेबराव देसाई, लहू पाटील, नगरसेवक कमलेश देवरे, अरुण पवार, माजी नगरसेविक आरती पवार, संदीप पाटोळे, कैलास चौधरी, पी. एन. पाटील, सुनिल पवार, मुन्ना शितोळे, डॉ. मिलिंद पाटील, विनोद कणसे, जगदीश गायकवाड, अशोक सुडके, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, यशवंत देवकर, सुभाष बाबर आदी उपस्थित होते. शाहू महाराजांचे सामाजिक समता आणि आरक्षणाचे विचार आजही समाजासाठी दिशादर्शक आहेत, असे मत श्री. कदमबांडे यांच्यासह मान्यवरांनी व्यक्त केले.