धुळे ः टुडे १ साठी.....शुभ रात्री........
--
मेनच्या शेजारील जाहिराती खाली
-
प्रतिबंधित गुटखा; एकाविरुद्ध गुन्हा
धुळे, ता. २६ : राज्यात प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची वाहतूक आणि विक्रीसाठी साठा बाळगल्याप्रकरणीे शहरातील मनोज नरेशकुमार अग्रवाल (वय ४०, रा. धुळे) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला. अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत प्रतिबंधित अन्नपदार्थांसह वाहन जप्त केले. अन्न सुरक्षा अधिकारी शशिकांत भारत राणे (रा. कोळवलेनगर, धुळे) यांच्या फिर्यादीनुसार २४ जूनला दुपारी सव्वाचारच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील एका प्लायवूडसमोर तपासणी झाली. त्यावेळी वाहनात (एमएच १८ बीएफ ७९१२) गुटखा हा १३ पाकिटात आढळला. कारवाईत दोन हजार २८८ रुपयांचा प्रतिबंधित माल व सुमारे ४५ हजारांचे वाहन जप्त केले.
--
अपहरणानंतर मारहाण;
सात जणांविरुद्ध गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २६ : देवपूर परिसरात १९ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण, जातीवाचक शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गौतम उत्तम सोनवणे (वय १९, रा. खेर्डे, ता. चाळीसगाव, ह. मु. मांडळ, ता. धुळे) याच्या फिर्यादीनुसार २५ जूनला दुपारी बारच्या सुमारास जयहिंद सिनिअर कॉलेजसमोरील आर. के. रसवंतीगृहाजवळ भूषण पाटील, राजू पाटील (दोघे रा. लोंजे, ता. चाळीसगाव) यांच्यासह अन्य पाच जणांनी त्यांना बळजबरीने वाहनात बसवून नेले. नंतर हाताबुक्क्यांनी मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिली. याप्रकरणी संशयित सात जणांविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला.
-