कॉफी टेबल बुक

कॉफी टेबल बुक
Published on
सीटीबी लेख --- महिला आरोग्याच्या सेवेत समर्पित : डॉ. विनोद महाले लीड पाळीदरम्यान होणाऱ्या असह्य वेदना सामान्य नसून, त्या ‘एन्डोमेट्रिओसिस’सारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात सुमारे २.६ कोटी, तर नाशिक जिल्ह्यात एक लाखाहून अधिक महिला या आजाराने ग्रस्त आहेत. महिलांमधील एन्डोमेट्रिओसिसच्या वाढत्या प्रमाणावर मात करण्यासाठी आणि त्यांना मातृत्व व उत्तम आरोग्य मिळवून देण्यासाठी डॉ. विनोद महाले (लॅपरोस्कोपिक सर्जन, रजनी मॅटर्निटी ॲन्ड लॅपरोस्कोपी सेंटर) अत्यंत आधुनिक उपचारांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देत आहेत. --- एन्डोमेट्रिओसिसची कारणे आणि दुर्लक्ष डॉ. विनोद महाले यांच्या मते, गेल्या पाच वर्षांत एन्डोमेट्रिओसिसच्या रुग्णांमध्ये सुमारे ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. उशिरा होणारे लग्न, बाळंतपणातील विलंब, तणावपूर्ण जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि पाळीतील वेदनांकडे दुर्लक्ष करणे ही यामागील प्रमुख कारणे आहेत. गर्भाशयाचे अस्तर (एन्डोमेट्रियम) बाहेर वाढल्याने सूज, जखमा आणि ‘चॉकलेट सिस्ट’ तयार होते. वंध्यत्वाच्या ३० ते ५० टक्के प्रकरणांमागे हा आजार कारणीभूत असतो. --- वीसहून अधिक वर्षांचा दांडगा अनुभव डॉ. विनोद उद्धव महाले यांची शैक्षणिक व व्यावसायिक पार्श्वभूमी अत्यंत तगडी असून, ते एमबीबीएस, डीजीओ (D.G.O.), डीएफपी (D.F.P. मुंबई) आणि लॅपरोस्कोपिक सर्जन आहेत. त्यांना स्त्रीरोग, प्रसूतिशास्त्र आणि वंध्यत्व निवारण क्षेत्रातील वीसहून अधिक वर्षांचा दांडगा अनुभव आहे. रजनी मॅटर्निटी ॲन्ड लॅपरोस्कोपी सेंटरच्या माध्यमातून त्यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. --- अत्याधुनिक उपचार आणि यश एक हजारहून अधिक यशस्वी लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियांचा अनुभव असणाऱ्या डॉ. महाले यांनी अनेक आव्हानात्मक केसेस हाताळल्या आहेत. एका महिलेच्या गर्भाशयातील १५ आणि १८ सेमीच्या ‘फायब्रॉइड’गाठी यशस्वीपणे काढणे, एका तरुणीच्या गर्भाशयातून १६ फायब्रॉइड्स काढून तिचे गर्भाशय वाचवणे, तसेच १०० किलो वजनाच्या महिलेच्या गर्भाशयातून सात ते आठ सेमीची गाठ काढणे अशा अवघड शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. लॅपरोस्कोपी हे या आजाराच्या निदानासाठी ‘गोल्ड स्टँडर्ड’ मानले जाते, ज्यामुळे बिनटाक्याचे ऑपरेशन, कमी वेदना आणि जलद रिकव्हरी शक्य होते. -- लक्षणे आणि वेळेवर तपासणीचे महत्त्व पाळीदरम्यान असह्य वेदना, अतिरक्तस्त्राव, गर्भधारणेत अडथळा, शारीरिक संबंधांदरम्यान वेदना किंवा सतत पाठ-ओटीपोटात दुखणे ही एन्डोमेट्रिओसिसची प्रमुख लक्षणे आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात औषधोपचार आणि गरजेनुसार लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेने ९० टक्के रुग्णांच्या वेदना कमी होतात, तर योग्य वेळेत उपचार झाल्यास गर्भधारणेची शक्यता ६० टक्क्यांपर्यंत वाढते. --- उपलब्ध सुविधा व जागतिक दर्जाची सेवा नाशिक येथील पंचवटी परिसरातील रजनी हॉस्पिटलमध्ये २४ तास अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (Endometriosis, Hysterectomy, Ovarian Cyst), वंध्यत्व निवारण, हाय-रिस्क डिलिव्हरी, गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान व शस्त्रक्रिया आणि २४ तास मेडिकल व पॅथॉलॉजिकल लॅब अशा सर्व सुविधा एकाच छताखाली पुरवल्या जातात. --- पुरस्कार व गौरव डॉ. विनोद महाले हे नाशिक जिल्ह्यातील एक नामांकित व विश्वासू स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडून महिलांना मातृत्वाचा आनंद मिळवून दिल्याबद्दल आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा विविध स्तरांवर सन्मान झाला आहे. --- कोट पाळीतील असह्य वेदना हा शरीराचा इशारा असतो. त्या सामान्य समजून दुर्लक्ष करू नका. वेळेत तपासणी आणि योग्य उपचार केल्यास वेदना कमी करता येतात, गुंतागुंत टाळता येते आणि मातृत्वाची शक्यताही वाढते. - डॉ. विनोद महाले, स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ, लॅपरोस्कोपिक सर्जन --- (पत्ता व मोबा. टाकणे आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com